Hockey India League 2024 Auction: तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा होत असलेल्या हॉकी इंडिया लीग (HIL 2024-2025) स्पर्धेचा लिलाव सोमवारी (14 ऑक्टोबर) समाप्त झाला. जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त खेळाडूंची अंतिम फेरीत निवड झाली होती. पुरुषांच्या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या आठ संघांनी खेळाडूंवर लाखोंची बोली लावली. त्यापैकी सर्वात महाग विकल्या गेलेल्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
Most Expensive Players of Day 1 Auction 💰
1. Captain Harmanpreet Singh 🇮🇳 | 78 Lakhs | Soorma Hockey Club (Punjab)
2. Star Forward Abhisekh Nain 🇮🇳 | 72 Lakhs | Shrachi Rarh Bengal Tigers
3. Star Midfielder Hardik Singh 🇮🇳 | 70 Lakhs | UP Rudras
4. Champion Defender… pic.twitter.com/BTy3whNtcx
— The Khel India (@TheKhelIndia) October 13, 2024
1. हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh): भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग या लिलावात सर्वात महागडा खेळाडू करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. हा अंदाज खरा ठरवत त्याने तब्बल 78 लाखांची बोली मिळवली. पंजाबस्थित सुरमा हॉकी क्लब (Soorma Hockey Club) यांनी ही बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. हरमनप्रीत याला सध्या जगातील सर्वात ड्रॅग फ्लिकर्सपैकी एक मानले जाते.
2. अभिषेक (Abhishek): भारतीय संघाचा फॉरवर्ड अभिषेक याला या लिलावात अनपेक्षितरित्या मोठी रक्कम मिळाली. कोलकात्याच्या श्राची रार बंगाल टायगर्स संघाने त्याच्यासाठी तब्बल 72 लाख रुपये मोजले. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी कलिंगा लान्सर्स व युपी रुद्राज देखील चांगलेच इच्छुक होते. मात्र, अखेरच्या क्षणी बंगाल संघाने बाजी मारली.
3. हार्दिक सिंग (Hardik Singh): भारतीय संघाचा अनुभवी मिडफिल्डर हार्दिक सिंग हा लिलावातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. युपी रुद्राज संघाने त्याच्यासाठी 70 लाखांची बोली लावली. हार्दिक याला भारतीय संघातील सर्वात चपळ व तांत्रिकदृष्ट्या मजबूत खेळाडू मानले जाते. मध्यफळीत खेळत असलेला हार्दिक गोलच्या संधी निर्माण करण्यात तसेच पेनल्टी कॉर्नर मिळवून देण्यात तरबेज आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
4. गोंझालो पियात (Gonzalo Peillat): जगातील सर्वोत्तम हॉकीपटूंमध्ये समाविष्ट असलेला जर्मनीचा गोंझालो पियात हाय लिलावातील चौथा सर्वात महागडा खेळाडू बनला. ड्रॅग फ्लिकर म्हणून आपली विशेष ओळख बनवलेल्या पियात याने अर्जेंटिना संघाचे देखील प्रतिनिधित्व केले होते. सध्या तो जर्मनीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो. हैदराबाद तुफान संघाने त्याच्यासाठी 68 लक्ष रुपये मोजले.
5. जिप जान्सेन (Jip Jansen): नेदरलँड्सचा अनुभवी बचावपटू जिप जान्सेन हा देखील या लिलावात मोठी रक्कम मिळवण्यात यशस्वी ठरला. तमिळनाडू ड्रॅगन्स संघाने त्याच्यावर 54 लाख रुपयांची बोली लावली.
(Most Expensive Players In Hockey India League 2024-2025 Auction)