Breaking News

बंगळुरू जाम होणार! RCB च्या चॅम्पियन्सची विक्टरी परेड, 1 वाजल्यापासून भरगच्च कार्यक्रम

RCB
Photo Courtesy: X

Victory Parade Of RCB Team: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाची मंगळवारी (3 जून) सांगता झाली. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबला नमवत पहिल्यांदा विजेतेपद उंचावले. तब्बल 18 वर्षे वाट पाहिल्यानंतर मिळालेल्या या विजेतेपदाचा आनंद सर्व चाहते साजरा करत आहे. त्याचाच भाग म्हणून बुधवारी (4 जून) बंगळुरू येथे विजेत्या संघाची ओपन बसमध्ये संपूर्ण शहरात मिरवणूक काढली जाईल.

Victory Parade Of RCB Team

आरसीबीने पंजाबला हरवल्यानंतर संघाच्या चाहत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. आरसीबी संघ व्यवस्थापनाने या विजयाचा जल्लोष करण्यासाठी बंगळुरू येथे विजयी रॅलीचे आयोजन केले असून, यामध्ये लाखो लोक सहभागी होऊ शकतात. कर्नाटक पोलिसांना याबाबत माहिती दिली असून, लोकांनी बंगळुरूच्या रस्त्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

दुपारी एक वाजता आरसीबीचा विजेता संघ अहमदाबादवरून बंगळुरू येथे पोहोचेल. त्यानंतर सर्व संघ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सदिच्छा भेट घेईल. दुपारी 3.30 वाजल्यापासून संघाच्या विक्री परेडला सुरुवात होईल. ही परेड जवळपास दोन तास चालू शकते. सायंकाळी सहा वाजल्यापासून चिन्नास्वामी स्टेडियम येथे संपूर्ण संघाचे स्वागत करण्याचे स्वागत करण्यात येईल. तसेच, खेळाडू चाहत्यांना संबोधित करतील. या सर्व विक्टरी परेडचे जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स थेट प्रक्षेपण करणार आहेत.

Victory Parade Of RCB Team

हे देखील वाचा: RCB च्या यशाचा सूत्रधार Andy Flower! कोच म्हणून 5 वर्षात सगळंच कमावलं, वाचा काय-काय जिंकल?

RCB च्या विजयानंतर बंगळुरूमध्ये दिवाळी, 3 जूनच्या रात्रीचा व्हिडिओ तुफान व्हायरल