R Truth WWE Carrier Ended: डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार आर-ट्रूथचा WWE सोबतचा प्रवास संपला आहे. काही काळापूर्वी ट्रूथने सांगितले होते की त्याला WWE ने करारमुक्त केले आहे. त्यामुळे आता नक्की झाले आहेत की, त्याचा WWE सोबतचा प्रवास समाप्त होतोय. याबद्दलची महत्त्वाची माहिती आता समोर येतेय.
R-Truth entertained us for years. We want him back. Make R-Truth trend. #WWERAW #WWE #RTruth #TKO #WeWantRTruth #WeWantTruth #RawOnNetflix pic.twitter.com/WVOWdFMjuN
— Adrian Perron (@RaginCajun77) June 2, 2025
R Truth WWE Carrier Ended
माजी WWE समालोचक जोनाथन कोचमन यांनी काही काळापूर्वी द कोच अँड ब्रो शोमध्ये एक मोठा खुलासा केला होता. एका सूत्राने त्यांना सांगितले होते की, आर-ट्रूथला सध्याच्या करारापेक्षा कमी पैसे देऊ करण्यात आले होते. म्हणून ट्रूथने करार पुढे वाढवण्यास नकार दिला.
आर-ट्रूथ याने सोशल मीडियावर WWE सोबतच्या त्याच्या प्रवासाच्या थांबण्याविषयी सांगितले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलेले. तसेच तो सर्व प्रकारच्या रेसलिंगमधून देखील निवृत्त होईल. यानंतर काही वेळातच जजमेंट डे सदस्य कार्लिटोनेही आपले मौन सोडले आणि सांगितले की, WWE सोबतचा त्याचा प्रवासही दोन आठवड्यात संपेल. त्याचा करार पुढे न नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
R Truth WWE Carrier Ended