
Coco Gaugh Won Womens French Open 2025:अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हिने फ्रेंच ओपन 2025 (French Open 2025) मध्ये इतिहास रचला आहे. एरिना सबालेंका हिला पराभूत करत तिने पहिल्यांदाच फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. यासोबतच 2015 नंतर प्रथमच अमेरिकन महिला टेनिसपटूने फ्रेंच ओपन जिंकण्याचा कारनामा केला.
COCO GAUFF ROLAND-GARROS CHAMPION 🏆#RolandGarros pic.twitter.com/duOMXfxaAP
— Roland-Garros (@rolandgarros) June 7, 2025
Coco Gauff Won Womens French Open 2025
सबालेंका व गॉफ या दोघींना देखील प्रथमच फ्रेंच ओपन जिंकण्याची संधी होती. वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, 7-6 असा टायब्रेकरमध्ये पहिला सेट जिंकल्यानंतर गॉफ हिने पुढील दोन सेटमध्ये आक्रमक खेळ करून 6-2 व 6-4 असे सेट जिंकत सामना व स्पर्धा आपल्या नावे केली.
दिग्गज सेरेना विल्यम्स हिने 2015 मध्ये अखेरच्या वेळी फ्रेंच ओपन जिंकण्याची कामगिरी केलेली. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी बॉस पहिलीच अमेरिकन टेनिसपट बनली. यापूर्वी 2023 मध्ये गॉफने अमेरिकन ओपन आपल्या नावे केली होती.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।