
UEFA Nations League 2025 Final: युरोपमधील मानाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या युएफा नेशन्स लीग (UEFA Nations League) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (8 जून) खेळला गेला. पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेल्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनचा 5-3 असा पराभव करत दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कर्णधार म्हणून पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) याच्या नावावर आणखी एक विजेतेपद जमा झाले.
𝗩𝗘𝗡𝗖𝗘𝗗𝗢𝗥𝗘𝗦 𝗡𝗢𝗩𝗔𝗠𝗘𝗡𝗧𝗘! 🏆🏆 #FazHistória | #NationsLeague pic.twitter.com/iJfn0AtpYz
— Portugal (@selecaoportugal) June 8, 2025
Portugal Won UEFA Nations League 2025
जर्मनीच्या म्युनिक येथे झालेल्या या सामन्यात पूर्ण वेळेत 2-2 अशी बरोबरी पाहायला मिळाली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत कोणताही गोल नोंदवला गेला नाही. अखेर टायब्रेकरमध्ये सामना खेचला गेला. पोर्तुगलचा अनुभवी गोलरक्षक डियागो कोस्टा याने अल्वारो मोराटा याची पेनल्टी अडवत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. अखेर 5-3 अशा फरकाने त्यांनी विजय संपादन केला. नेशन्स लीग स्पर्धा दोन वेळा जिंकणारा पोर्तुगाल एकमेव देश ठरला आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
Portugal Won UEFA Nations League 2025
हे देखील वाचा: UEFA Conference League 2025 जिंकून चेल्सी झाली मालामाल, पैशाचा पडला अक्षरशः पाऊस
2 comments
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।