
FIFA Club World Cup 2025 Quarter Finals: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. राऊंड ऑफ 16 च्या समाप्तीनंतर अव्वल आठ संघ आता मैदानात दिसतील. राऊंड ऑफ 16 मध्ये अनेक दिग्गज संघांना पराभूत व्हावे लागले. उपांत्यपूर्व फेरीचे सामने शनिवारी (5 जुलै) आणि रविवारी (6 जुलै) खेळले जातील.
Next up: #FIFACWC Quarter-Finals. 🔜 pic.twitter.com/T49Cj3bOOy
— FIFA Club World Cup (@FIFACWC) July 2, 2025
FIFA Club World Cup 2025 Quater Finals
उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात ब्राझीलचा फ्लुमिनंस व सौदी अरेबियातील अल हिलाल हे भिडणार आहेत. उपांत्यपूर्व फेरीचा दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा ब्राझिलियन संघ पल्मेरेस हा इंग्लिश क्लब चेल्सीशी दोन हात करेल. तिसऱ्या सामन्यात फ्रान्सचा पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी व जर्मनीचा बायर्न म्युनिक लढतील. तर, अखेरच्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनचा रियाल माद्रिद व जर्मनीचा बोरूशिया डॉर्टमंड एकमेकांसमोर आव्हान सादर करतील.
पहिल्या दोन सामन्यातील विजेते पहिल्या उपांत्य सामन्यात तर, दुसऱ्या दोन सामन्यातील विजेते दुसऱ्या उपांत्य सामन्यात खेळणार आहेत. उपांत्य सामने अनुक्रमे 9 व 10 जुलै रोजी होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 14 जुलै रोजी मेट लाईफ स्टेडियम न्यूजर्सी येथे खेळला जाईल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…
Chinnaswamy Stadium Stampede बाबत कोर्टाचा मोठा निर्णय, 11 जणांच्या मृत्यूला यांना धरले जबाबदार