
ENG vs IND Lords Test Day 4 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने जबरदस्त सांघिक कामगिरी करत सामना जिंकण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला 135 धावा विजयासाठी आवश्यक असतील.
Stumps on Day 4 at Lord's 🏟️#TeamIndia reach 58/4 in the 2nd innings
135 more runs away from victory in the 3rd Test 🙌
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#ENGvIND pic.twitter.com/ENXq8fudEJ
— BCCI (@BCCI) July 13, 2025
ENG vs IND Lords Test Day 4 Highlights
– इंग्लंडने 2 धावांच्या आघाडीसह सुरू केला दिवसाचा खेळ
– भारतीय गोलंदाजांनी आग ओकणारे गोलंदाजी करत अवघ्या 50 धावात माघारी पाठवले आघाडीचे तीन फलंदाज
– चौथ्या गड्यासाठी रूट व ब्रूकची 34 धावांची भागीदारी
– मोठा फटका खेळण्याच्या नादात ब्रूक 23 धावांवर बाद
– लंचपर्यंत इंग्लंड 4 बाद 98
– दुसऱ्या सत्रात रूट व कर्णधार बेन स्टोक्सची संयमी फलंदाजी
– दोघांची पाचव्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी
– रूटला बाद करत वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने मिळवून दिले यश
– चहापानापर्यंत इंग्लंड 6 बाद 175
– मालिकेतील इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज जेमी स्मिथलाही केवळ आठ धावांवर सुंदरनेच पाठवले तंबूत
– अवघ्या 17 धावात इंग्लंडचे अखेरचे चार फलंदाज बाद
– वॉशिंग्टन सुंदरने मिळवले सर्वाधिक चार बळी
– भारतासमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
– भारताची खराब सुरुवात, यशस्वी जयस्वाल खाते न खोलता बाद
– केएल राहुल व करूण नायरची 36 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी
– करूणला 13 व शुबमन गिलला 6 धावांवर कार्सने केले बाद
– दिवसातील अखेरच्या षटकात नाईट वॉचमन आकाश दीप एका धावेवर बाद
– केएल राहुल 33 धावा करून नाबाद
– चौथ्या दिवशी भारत 4 बाद 58
– अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 135 धावांची आवश्यकता
(Latest Cricket News)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा:
ENG vs IND Lords Test Day 3: भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला दमवले, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Lords Test Day 1: रूटने गाजवला पहिला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स