Breaking News

अखेर Khalid Jamil पेलणार भारतीय फुटबॉलचे शिवधनुष्य, AIFF कडून मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी

khalid jamil
Photo Courtesy: X

Khalid Jamil Is Indian Football Team New Head Coach: जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाचा काथ्याकूट संपला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) भारताच्याच खालिद जमील यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे दिली. त्यांनी या शर्यतीत स्टिफन कॉन्स्टेनटाईन व स्टीफन तारकोविक यांना मागे टाकले. 

Khalid Jamil Is Indian Football Team New Head Coach

मनेलो मार्केझ यांच्या राजीनाम्यानंतर महासंघाने नव्या प्रशिक्षकांसाठी जाहिरात काढली होती. शंभरपेक्षा जास्त प्रशिक्षकांनी यासाठी अर्ज केलेले. अखेर तांत्रिक समितीने स्टिफन कॉन्स्टेनटाईन, स्टीफन तारकोविक व खालिद जमील या तीन जणांना अखेरच्या फेरीसाठी निवडलेले. जवळपास दहा दिवसानंतर तांत्रिक समितीने शेवटी जमील हे भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील असे जाहीर केले.

जमील यांना सध्या भारतातील सर्वोत्तम फुटबॉल प्रशिक्षक मानले जाते. नॉर्थ ईस्ट युनायटेड संघासह त्यांनी आय लीगच्या प्ले ऑफ्समध्ये धडक मारलेली. अशी कामगिरी करणारे ते पहिले व एकमेव भारतीय प्रशिक्षक ठरलेले. भारतीय संघाला एएफसी एशिया कप स्पर्धेसाठी पात्र करणे त्यांच्या पुढील सर्वात पहिले आव्हान असेल.

सध्या 48 वर्षांच्या असलेल्या जमील यांनी भारतासाठी 40 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर, ईस्ट बंगाल, मोहन बागान, नॉर्थ ईस्ट युनायटेड व जमशेदपूर एफसी अशा मोठ्या क्लबचे मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील त्यांच्याकडे अनुभव आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: या तिघांपैकी एक बनणार Indian Football Team चा हेड‌ कोच! AIFF लवकरच करणार घोष

 Top Five OCI Footballers: हे पाच OCI खेळाडू बदलू शकतात भारतीय फुटबॉलचा वर्तमान, 2030 फिफा वर्ल्डकप लक्ष्य