
Dunith Wellalage Father Passed Away: गुरुवारी (18 सप्टेंबर) आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (SL vs AFG) हा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत आपल्या गटात अव्वस्थान पटकावले. मात्र, सामना संपताच संघाच्या आनंदात विरजण घालणारी बातमी आली. संघाचा प्रमुख फिरकीपटू दुनिथ वेल्ललागेच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
The moment when Mohamed Nabi was informed about the sudden demise of Dunith Wellalage’s father. Mohamed Nabi hit 5 sixes of Dunith Wellalage’s bowling in the last over of Afghanistan’s innings. pic.twitter.com/sjfAUzQvE6
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) September 18, 2025
Dunith Wellalage Father Passed Away
ब गटातील या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय साजरा केला. मात्र, अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना अखेरच्या षटकात दुनिथ वेल्ललागेच्या गोलंदाजीवर धावांची लयलुट केली. अनुभवी मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने त्याच्या गोलंदाजीवर पाच षटकार ठोकले. दुनिथ याचा चार षटकात तब्बल 49 धावा चोपल्या गेल्या.
त्याचवेळी श्रीलंकेत हा सामना पहात असलेले दुनिथचे वडील सुरंगा वेल्लालागे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले गेले. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली गेली. सामना संपल्यानंतर ही बातमी श्रीलंका संघाला व वेल्लालागेला देण्यात आले. तसेच, अफगाणिस्तान संघातील खेळाडूंना देखील ही बातमी दिली गेली. त्यानंतर दोन्ही संघ व संपूर्ण क्रिकेटविश्व स्तब्ध झाले. आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी दुनिथ तातडीने कोलंबोला रवाना झाला.
केवळ 22 वर्षांचा असलेला दुनिथ श्रीलंका संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने आतापर्यंत श्रीलंकेसाठी 29 वनडे, 4 टी20 व 1 कसोटी सामना खेळला असून, त्याच्या या यशात वडिलांचा मोठा वाटा होता.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Apollo Tyres बनले टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर! इतक्या कोटींमध्ये ठरला सौदा
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।