Breaking News

भारतीय नेमबाजीचा नवा सम्राट! नेमबाजी विश्वचषकात Samrat Rana चा सुवर्णवेध

samrat rana
Photo Courtesy: X

Samrat Rana Won Gold In Shooting: भारताचा युवा नेमबाज सम्राट राणा याने कैरो येथे झालेल्या ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक एअर पिस्टल जागतिक विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.

Samrat Rana Won Gold In 10M Air Pistol

राणाने 243.7 गुणांसह पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. चीनच्या हू काईला फक्त 0.4 गुणांनी मागे टाकले. भारताच्याच वरुण तोमरने कांस्यपदक जिंकले. यापूर्वी, दोन्ही नेमबाजांनी पात्रता फेरीत प्रत्येकी 586 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते.

राणाने वरुण तोमर आणि शर्वण कुमार यांच्यासह भारताला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल सांघिक सुवर्णपदक जिंकण्यास मदत केली.

केवळ 22 वर्षाचा असलेला राणा अभिनव बिंद्रा, रुद्रांक्ष पाटील, तेजस्विनी सावंत, शिवा नरवाल आणि ईशा सिंग या दिग्गजांच्या यादीत सामील झाला. जागतिक विजेतेपद जिंकणारा तो फक्त पाचवा भारतीय नेमबाज ठरला.

दरम्यान, दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकर वैयक्तिक पदक मिळविण्यापासून हुकली. तिने ईशा सिंग आणि सुरुची सिंगसह महिला सांघिक रौप्यपदक जिंकले. या चार पदकांसह कैरो चॅम्पियनशिपमध्ये भारताची पदकांची संख्या नऊ झाली आहे, ज्यामध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदके आहेत, जी चीनच्या 12 पदकांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: MCA International Cricket Stadium वर रंगणार IPL 2026? या संघाचे होम ग्राऊंड म्हणून चर्चा