
IPL 2026 Retention: आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची व करारमुक्त करण्याची अखेरची तारीख 15 नोव्हेंबर आहे. तत्पूर्वी, अनेक संघ ट्रेडमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या या स्पर्धेच्या नव्या हंगामाआधी कोणाला नारळ मिळणार आणि कोणाला दुसरी संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपणही डेडलाईनच्या आधी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले जाईल व कोणाला मोकळे केले जाईल याचा अंदाज घेऊया.
IPL 2026 Retention Likely Retained & Release Players
1) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB): तब्बल 18 वर्षाचा दुष्काळ संपवत आरसीबीने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे आपले हे विजेतेपद राखण्यासाठी ते प्रयत्न करतील. मागील वर्षाच्या संघात फारसा बदल न करता संघ एकसंध राखण्यावर त्यांचा भर असेल.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, भुवनेश्वर कुमार, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, जोश हेजलवूड, सुशय शर्मा, जेकब बेथल, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, स्वप्निल सिंग व मनोज भांडगे
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: लियाम लिव्हिंगस्टोन, रसिख सलाम, स्वस्तिक चिकारा, मयंक अगरवाल, लुंगी एन्गिडी, मोहित राठी, अभिनंदन सिंग व यश दयाल.
2) पंजाब किंग्स (Punjab Kings)- तब्बल 11 वर्षानंतर आयपीएल अंतिम सामना खेळलेल्या पंजाब किंग्स संघासाठी आयपीएल 2025 अविस्मरणीय राहिलेली. विजय मिळवण्यात त्यांना अपयश आले तरी, संघाचा समतोल पाहता संघ आयपीएल 2026 देखील गाजवण्याचा प्रयत्न करेल. आरसीबीप्रमाणे पंजाब देखील आपल्या संघात मोठे बदल करण्याची शक्यता नाही.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिश, अर्शदीप सिंग, अझमत ओमरझाई, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाक, हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट, मार्को जेन्सन, मुशीर खान, पैला अविनाश व यश ठाकूर
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: ग्लेन मॅक्सवेल, हरनूर ब्रार, ऍरन हार्डी, लॉकी फर्ग्युसन व कुलदीप सेन
3) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)- पाच वेळा आयपीएल आपल्या नावे केलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी मागील पाच वर्षांपासून विजेतेपद दूर राहिले आहे. त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न 2026 मध्ये ते करतील. रिटेन्शनच्या आधी शार्दुल ठाकूर व शेरफन रुदरफोर्ड यांना ट्रेड करत मुंबईने आघाडी घेतलेली दिसते. लिलावात आणखी मजबूत संघ बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, रायन रिकल्टन, मिचेल सॅंटनर, अल्लाह गझनफार, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनीकुमार, विग्नेश पुथूर, कर्ण शर्मा, नमन धीर, बेवॉन जेकब्स, सत्यनारायण राजू व अर्जुन तेंडुलकर.
ट्रेड खेळाडू: शार्दुल ठाकूर व शेरफन रुदरफोर्ड
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: विल जॅक्स, रिस टोप्ली, राजअंगद बावा, रॉबिन मिंझ, के श्रीजिथ व लिझाड विल्यम्स
4) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)- आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघासाठी आयपीएल 2025 विसरण्यासारखी राहिली होती. संघाला गुणतालिकेच्या तळाशी राहावे लागलेले. त्यानंतर, आगामी आयपीएलसाठी त्यांनी तयारी केल्याचे दिसते. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला आपल्या ताफ्यात घेत अनुभवी रवींद्र जडेजाला राजस्थानला देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जाते. या ट्रेडबद्दल अद्याप औपचारिक घोषणा झाली नसली तरी, रिटेन्शनच्या आधी याबाबत स्पष्टता येईल.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, खलिल अहमद, नॅथन एलिस, नूर अहमद, मथिशा पथिराना, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, गुरजपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ व मुकेश चौधरी
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, शेख रशिद, दीपक हुडा, विजय शंकर, कमलेश नागरकोटी व रविचंद्रन अश्विन (निवृत्त)
ट्रेड होण्याची शक्यता असलेले खेळाडू: संजू सॅमसन हा चेन्नई संघात दाखल होण्याची व रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थान रॉयल्ससाठी खेळण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
IPL 2026 Retention
5) कोलकाता नाईट रायडर्स (KKR)- आतापर्यंत तीन विजेतेपद पटकावलेल्या केकेआरसाठी मागील हंगाम तितका आशादायी राहिला नव्हता. नवा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात संघातील वरिष्ठ खेळाडू अपेक्षित कामगिरी करू शकले नव्हते. त्यामुळे यावेळी त्यांच्या संघात मोठा बदल झालेला दिसू शकतो.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: आंद्रे रसेल, सुनील नरीन, हर्षित राणा, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंग, लवनिथ सिसोदिया, वैभव अरोरा, वरूण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, मयंक मार्कंडे व उमरान मलिक
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, मनिष पांडे, रॉवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, मोईन अली, चेतन सकारिया व एन्रिक नॉर्किए
6) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)- अनेक बडे खेळाडू सोडल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाची आयपीएल 2025 मधील कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. इतकेच नव्हेतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील संघाला रामराम केला आहे. तर, कर्णधार संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्सकडे ट्रेड होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एक नवा संघ उभा करण्याचे आव्हान राजस्थानसमोर असेल.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, वैभव सुर्यवंशी, नितिश राणा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, आकाश मधवाल, युद्ववीर चरक, कुमार कार्तिकेय, लुहान डे प्रिटोरियस व कुणाल राठोड
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: शिमरन हेटमायर, वनिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, फझलहक फारूखी, तुषार देशपांडे, शुबम दुबे, क्वेना मफाका व अशोक शर्मा
ट्रेड होण्याची शक्यता असलेले खेळाडू: संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडे जात रविंद्र जडेला आणि सॅम करन राजस्थान रॉयल्ससाठी खेळण्याची चर्चा सुरू आहे.
7) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)- आयपीएल 2024 पासून अतिआक्रमक क्रिकेट खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडे देखील चांगल्या खेळाडूंची फौज तयार आहे. मागील हंगामात संघ फारसा यशस्वी ठरला नसला तरी, संघ व्यवस्थापन त्याच खेळाडूंवर पुन्हा विश्वास ठेवण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील हा संघ रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न करेल.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, हेन्रिक क्लासेन, इशान किशन, नितिशकुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, राहुल चहर, अभिनव मनोहर, कामिंदू मेंडिस, आर. स्मरण, ईशान मलिंगा व झिशान अन्सारी
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: अथर्व तायडे, ऍडम झंपा, सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, सचिन बेबी व जयदेव उनादकत
ट्रेड खेळाडू: मोहम्मद शमी ट्रेड होत लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग बनला आहे
8) गुजरात टायटन्स (Gujarat Titans)- विद्यमान भारतीय कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघ मागील दोन हंगामातील अपयश भरून काढण्याचा प्रयत्न 2026 मध्ये करेल. एका स्थिर संघाला आणखी मजबूत बनवण्याचा मानस मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याचा असेल.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: शुबमन गिल, जोस बटलर, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, अर्शद खान, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, साई किशोर व शाहरुख खान
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: इशांत शर्मा, अनुज रावत, महिपाल लोमरोर, कुसल मेंडिस, दसून शनाका, गेराल्ड कोएत्झे, गुरनूर ब्रार, कुमार कुशाग्र, जयंत यादव, करीम झनत व निशांत सिंधू
ट्रेड खेळाडू: शेरफन रुदरफोर्ड ट्रेड होत मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे.
IPL 2026 Retention
9) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)- आयपीएल 2025 मध्ये शानदार सुरुवात केल्यानंतर दिल्लीची गाडी रुळावरून हटली होती. परिणामी, त्यांना प्ले ऑफ्ससाठी पात्र होता आले नव्हते. आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्लीसाठी हा हंगाम महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, त्यासाठी त्यांना आपल्या संघात मोठे बदल करावे लागू शकतात.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: अक्षर पटेल, केएल राहुल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, करूण नायर, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, अभिषेक पोरेल, समीर रिझवी, माधव तिवारी, विपराज निगम, टी.नटराजन, मुकेश कुमार, मानवंत कुमार व डोनावन फरेरा
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: जॅक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, हॅरी ब्रूक, दर्शन नळकांडे, दुष्मंता चमिरा, टी. विजय, अजय मंडल व मोहित शर्मा.
10) लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants)- अनेक बडे टी20 खेळाडू असताना देखील लखनऊ सुपरजायंट्स मागील हंगामा अपेक्षित कामगिरी करू शकली नव्हती. त्यामुळे आयपीएल 2026 रिटेन्शन व लिलावात काही महत्त्वाचे निर्णय घेत संघ मजबूत करण्याचा प्रयत्न ते करतील.
रिटेन होण्याची शक्यता असलेले खेळाडू: रिषभ पंत, मिचेल मार्श, ऐडन मार्करम, निकोलस पूरन, अब्दुल समद, आयुष बदोनी, युवराज चौधरी, शहाबाज अहमद, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, आवेश खान, एम. सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव व विल ओरोर्क
रिलीज होण्याची शक्यता असलेले खेळाडू: मॅथ्यू ब्रित्झके, आकाश दीप, शमार जोसेफ, मयंक यादव, आकाश सिंग, मोहसीन खान, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, रवी बिश्नोई व डेव्हिड मिलर
ट्रेड खेळाडू: शार्दुल ठाकूर ट्रेड होत मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनला आहे. मोहम्मद शमी ट्रेड होत लखनऊ सुपरजायंट्स संघात सामील झाला आहे.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: MCA International Cricket Stadium वर रंगणार IPL 2026? या संघाचे होम ग्राऊंड म्हणून चर्चा
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।