
CSK After IPL 2026 Retention: शनिवारी (15 नोव्हेंबर) आयपीएल 2026 साठी खेळाडू कायम करण्यात आले. प्रत्येक संघांनी भविष्यातील रणनीतीचा विचार करत आपला संघ मजबूत बनवण्यावर भर दिला. तसेच, काही बड्या खेळाडूंना मुक्त केले गेले. मागील हंगामात सपशेल अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आता आगामी लिलावात (IPL Auction 2026) त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
CSK After IPL 2026 Retention
सीएसके संघ व्यवस्थापनाने इतिहासात प्रथमच 11 खेळाडू रिलीज केले. तर, दोन खेळाडूंना ट्रेड करत दुसऱ्या संघात पाठवले. मागील 13 वर्षापासून संघाचा भाग असलेल्या रवींद्र जडेजाला राजस्थानकडे ट्रेड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तर, मथिशा पथिराना, रचिन रविंद्र व डेवॉन कॉनवे या अनेक वर्षापासून संघाचे सदस्य असलेल्या खेळाडूंना देखील नारळ दिला. राखलेल्या खेळाडूंमध्ये अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे.
अबुधाबी येथे 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या मिनी लिलावात सीएके 43.40 कोटी इतक्या मोठ्या रकमेसह सहभागी होईल. केकेआरनंतर ही दुसरी सर्वात मोठी रक्कम असेल. यामध्ये त्यांना एकूण नऊ खेळाडू निवडण्याची संधी राहणार आहे. यापैकी चार विदेशी खेळाडू ते विकत घेऊ शकतात.
कायम केलेल्या संघाचा विचार केल्यास सीएसके एका भारतीय फिरकीपटू मागे जाऊ शकते. यामध्ये रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) व राहुल चहर (Rahul Chahar) हे पर्याय त्यांच्या पुढे असणार आहेत. सीएसके केकेआरने करारमुक्त केलेला दिग्गज अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) याच्यासाठी बोली लावण्याची देखील दाट शक्यता आहे. आणखी दोन वर्षाचा विचार केल्यास रसेल डेथ गोलंदाजी व फिनीशर अशी दुहेरी भूमिका बजावू शकतो. याव्यतिरिक्त फिनीशर व फिरकी अष्टपैलू असा विचार केल्यास लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) व ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) या आणखी दोन दिग्गजांचा पर्याय त्यांच्यासमोर असेल.
सीएसके या लिलावात एका डेथ गोलंदाजी स्पेशालिस्टसाठी मोठी बोली लावण्याची शक्यता आहे. त्यांनी रिलीज केलेल्या मथिशा पथिराना (Matheesha Pathirana) याच्यासाठी ते पुन्हा बोली लावू शकतात. तर, मॅट हेन्री व एन्रिक नॉर्किए यांच्या देखील नावाचा विचार होऊ शकतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: IPL 2026 Retention: आयपीएल 19 साठी रिटेन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
सीएसकेने रिटेन केलेले खेळाडू: एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, खलिल अहमद, नॅथन एलिस, नूर अहमद, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, गुरजपनीत सिंग, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन, संजू सॅमसन (ट्रेड)
रिलीज झालेले खेळाडू: डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र, राहुल त्रिपाठी, शेख रशिद, दीपक हुडा, विजय शंकर, कमलेश नागरकोटी, आंद्रे सिद्धार्थ, मथिशा पथिराना, वंश बेदी, रविचंद्रन अश्विन (निवृत्त), रवींद्र जडेजा व सॅम करन (ट्रेड)
Latest Sports News In Marathi
kridacafe