![abhishek das catch](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/abhishek-das-catch-ss.jpg)
Abhishek Das Catch|सध्या कोलकाता येथे बंगाल प्रो टी20 लीग (Bengal Pro T20 League) ही स्पर्धा खेळली जात आहे. आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) यांनी प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले. मात्र, स्पर्धेतील सातव्या सामन्यात एक शानदार झेल घेतल्याने ही स्पर्धा चर्चेत आली आहे. बंगालचा युवा क्रिकेटपटू अभिषेक दास (Abhishek Das) याने हा झेल घेतला.
Abhishek Das catches the perfect catch!
What a sight it was!Catch all excitement LIVE on @JioCinema @Sports18 @FanCode #BengalProT20@CabCricket | @arivaasports pic.twitter.com/nV3bdIyKnX
— Bengal Pro T20 League (@bengalprot20) June 15, 2024
शुक्रवारी (14 जून) रेशमी मेदिनापूर विझार्ड्स व आदमस हावडा वॉरियर्स यांच्यातील सामन्यात हा झेल पकडला गेला. दिपक महातो याला बाद करताना अभिषेक याने लॉन्ग ऑनवर हा झेल टिपला. या सामन्यात वॉरियर संघाने विजय मिळवला.
🗓 #OnThisDay in 2019….@BenStokes38 with an absolutely ridiculous catch on the opening day of the 2019 World Cup 🔥
🗣 “You cannot do that Ben Stokes.”pic.twitter.com/uzXFSYJUS3
— England Cricket (@englandcricket) May 30, 2023
अनेक जण हा भारतीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्तम झेल असल्याचे म्हणत आहेत. तसेच काहींनी या झेलाची तुलना बेन स्टोक्स याने 2019 विश्वचषकात टिपलेल्या झेलाशी (Ben Stokes 2019 World Cup Catch) केली आहे. स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा अविश्वसनीय झेल टिपला होता.
(Abhishek Das Catch In Bengal Pro T20 League Goes Viral)