Breaking News

PKL 11 च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह, फेडरेशनने घेतला मोठा निर्णय, कबड्डीप्रेमींचा…

pkl 11
Photo Courtesy: X/PKL

PKL 11: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामाची सर्वजण वाट पाहत आहेत. पीकेएल 11 (PKL 11) कधी सुरू होणार? असे प्रश्न चाहते विचारत असतानाच, आता एक मोठी बातमी समोर येतेय.

एमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) ही भारतीय कबड्डीची सर्वोच्च संस्था प्रो कबड्डीचे आयोजन करत असते. यासाठी स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून मशाल स्पोर्ट्स (Mashal Sports) यांच्याकडे नियोजनाची संपूर्ण जबाबदारी दिली गेलेली. मशाल स्पोर्ट्स यांनी स्पर्धेचे सर्व दहा हंगाम यशस्वीरित्या आयोजित करून दाखवले. आता याच मशाल स्पोर्ट्ससोबत असलेला करार संघटनेने समाप्त केला आहे. तसेच, अद्याप नव्या आयोजकांबाबत संघटनेने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे स्पर्धेचा अकरावा हंगाम कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

कबड्डीला ग्लॅमर मिळवून देण्याचे काम मशाल स्पोर्ट्स यांनी केले होते. स्टार स्पोर्ट्स यांच्या प्रसारणाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा त्यांनी जगविख्यात केली. त्यामुळे आता भविष्यात नवा आयोजक आला तरी ही स्पर्धा तितक्याच मोठ्या रूपात पाहायला मिळणार का? असा सवाल कबड्डीप्रेमी उपस्थित करत आहेत.

आतापर्यंत प्रो कबड्डी लीगचे दहा हंगाम झाले आहेत. पटना पायरेट्स सर्वाधिक तीन विजेतेपदांसह ‌स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यानंतर जयपुर पिंक पँथर्स यांनी दोन विजेतेपदे पटकावली आहेत. याव्यतिरिक्त यु मुंबा, बेंगलुरू बुल्स, बंगाल वॉरियर्स, दबंग दिल्ली व पुणेरी पलटण यांना प्रत्येकी एकदा विजेतेपद जिंकण्यात यश आले आहे.

(AKFI & Mashal Sports Partway Before PKL 11)