
PKL 12 Training Starts: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या नव्या हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केली आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) साठी सर्व बारा संघ देशातील विविध शहरांमध्ये सराव करत आहेत. त्यापैकी चार संघांनी महाराष्ट्रात आपले बस्तान बसवल्याचे समजते.
Forged by fire in the gym 💪#UMumba | #आमचीMumba pic.twitter.com/0kPOBFsqUD
— U Mumba (@umumba) July 23, 2025
All Teams Started PKL 12 Prepration
पीकेएल 12 ची सुरुवात 29 ऑगस्टपासून होणार आहे. हरियाणा स्टिलर्स स्पर्धेचे विद्यमान विजेते आहेत. हंगामापूर्वी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे. तसेच, अनेक संघानी आपले मुख्य प्रशिक्षण देखील बदलल्याचे दिसून येते. त्यामुळे हा हंगाम नाविन्यपूर्ण ठरू शकतो. अनेक दिग्गज कबड्डीपटू निवृत्त झाल्यानंतर, बरेच युवा खेळाडू या हंगामात दिसणार आहेत.
यु मुंबा (U Mumba) संघ सध्या पुण्याजवळील भोसरी येथे आपला सराव करतोय. तर, पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाने मुंबईतील साफळे येथे तयारीला सुरुवात केली आहे. तीन वेळचा पीकेएल विजेता संघ पटना पायरेट्स संघाने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आपला ट्रेनिंग कॅम्प लावलेला दिसून येतोय. तर, बंगाल वॉरियर्स संघ देखील नवी मुंबई येथेच सराव करताना दिसत आहे.
तमिल थलायवाज चेन्नई येथील पुणेरी जिमखाना, तेलुगु टायटन्स चंदिगड, हरियाणा स्टिलर्स कर्नाटक येथील आयआयएस इन्स्टिट्यूट बल्लारी व गुजरात जायंट्स बेंगलोर येथे सराव करत आहेत. जयपुर पिंक पॅंथर्सने डेहराडून, बंगळुरू बुल्सने सत्व कॅम्प आंध्र प्रदेश, दबंग दिल्ली बीके अकादमी मेरठ व युपी योद्धाज लखनऊ येथे आपल्या आगामी हंगामाची पूर्वतयारी करतायेत.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: PKL 12 Auction: शादलू सलग तिसऱ्या वर्षी दोन कोटींच्या पार, पवन सेहरावतची घटली किंमत