Breaking News

Team India चे भरगच्च वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्यात मोठे सामने, पाहा वर्षभरातील कार्यक्रम

Team India 2024-2025 Fixture|भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या 2024-2024 हंगामातील घरगुती आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड व बांगलादेशी‌ हे मोठे संघ भारताचा दौरा करतील.

team india
Photo Courtesy: X/Rohit Sharma

सध्या टी20 विश्वचषक खेळत असलेला भारतीय संघ यानंतर झिम्बाब्वे व श्रीलंका यांचा छोटेखानी दौरा करणार आहे. त्यानंतर बांगलादेश संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतात (Bangladesh Tour India 2024) येईल. ते या दौऱ्यावर दोन कसोटी व तीन टी20 सामने खेळतील.

‌ यानंतर लगेचच न्यूझीलंड संघ (Newzealand Tour Of india 2024) भारतात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. तर, 2025 च्या जानेवारीत इंग्लंडचा संघ भारतात (England Tour Of India 2025) येणार आहे. या दौऱ्यावर ते पाच सामन्यांची टी20 मालिका तसेच तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतील.

बांगलादेशचा भारत दौरा 2024-

पहिली कसोटी 19-23 सप्टेंबर (चेन्नई)

दुसरी कसोटी 27 सप्टेंबर- 1 ऑक्टोबर (कानपूर)

पहिला टी20 सामना 6 ऑक्टोबर (धर्मशाला)

दुसरा टी20 सामना 9 ऑक्टोबर ( दिल्ली)

तिसरा टी20 सामना 12 ऑक्टोबर (हैदराबाद)

न्यूझीलंडचा भारत दौरा 2024-

पहिली कसोटी 16-20 ऑक्टोबर (बेंगलोर)

दुसरी कसोटी 24-28 ऑक्टोबर (पुणे)

तिसरी कसोटी 1-5 नोव्हेंबर (मुंबई)

इंग्लंडचा भारत दौरा 2025-

पहिला टी20 सामना 22 जानेवारी (चेन्नई)

दुसरा टी20 सामना 25 जानेवारी (कोलकाता)

तिसरा टी20 सामना 28 जानेवारी (राजकोट)

चौथा टी20 सामना 31 जानेवारी (पुणे)

पाचवा टी20 सामना 2 फेब्रुवारी (मुंबई)

पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारी (नागपूर)

दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारी (कटक)

तिसरा वनडे सामना 12 फेब्रुवारी (अहमदाबाद)

BCCI announces fixtures for Team India international home season 2024-25

One comment

  1. lasix liquido Increased arterial stiffness has been identified as an independent risk factor for cardiovascular morbidity and mortality

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *