French Open 2024|फ्रेंच ओपन 2024 च्या पुरुष एकेरीचा पहिला उपांत्य सामना (French Open 2024 Semi Final) स्पेनचा कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व इटलीच्या जानिक सिन्नर (Jannik Sinner) यांच्या दरम्यान खेळला गेला. पहिला सेट गमावल्यानंतर तिसऱ्या मानांकित अल्कारेझ याने जबरदस्त पुनरागमान करत दुसऱ्या मानांकित सिन्नरचा 2-6, 6-3, 3-6, 6-4, 6-3 असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात कॅस्पर रूड व ऍलेक्झांडर झेरेव आमने-सामने येणार आहेत.
That first Roland-Garros final feeling 🙌🇪🇸#RolandGarros pic.twitter.com/kubKiXBLjt
— Roland-Garros (@rolandgarros) June 7, 2024
अव्वल मानांकित स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अल्कारेझ व सिन्नर कोण अंतिम फेरीत प्रवेश करणार याची उत्सुकता लागली होती. सामन्याच्या सुरुवातीला सिन्नर याने जोरदार ऊर्जा दाखवत अल्कारेझ याला आक्रमणाची संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये मात्र अल्कारेझने बरोबरी साधली. तिसरा सेट पुन्हा एकदा सिन्नर याने आपल्या नावे केला. यानंतर मात्र अल्कारेझने आपला फॉर्म दाखवला आणि सिन्नर याला चुका करायला भाग पाडले. सलग दोन सेट जिंकत त्याने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात जोकोविचच्या दुखापतीमुळे पुढे चाल मिळालेला कॅस्पर रूड व 14 वेळचा फ्रेंच ओपन विजेता राफेल नदाल याला पराभूत करणारा ऍलेक्झांडर झेरेव भिडतील. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इटलीची जास्मिन पावलोनी अग्रमानांकित इगा स्वियाटेकशी भिडेल.
(Carlos Alcaraz Entered In French Open 2024 Final Beat Jannik Sinner)
I used to be very pleased to search out this internet-site.I wanted to thanks to your time for this wonderful read!! I definitely having fun with each little bit of it and I have you bookmarked to take a look at new stuff you blog post.
he blog was how do i say it… relevant, finally something that helped me. Thanks
Merely wanna input on few general things, The website layout is perfect, the written content is really good. “All movements go too far.” by Bertrand Russell.