
French Open 2024|फ्रेंच ओपन 2024 (French Open 2024) स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना रविवारी (9 जून) खेळला गेला. रोलॅंड गॅरोस (Roland Garros) च्या लाल मातीवर झालेल्या या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने शानदार विजय मिळवला. जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) याची झुंज अपयशी ठरली.
CARLOS I, PRINCE OF CLAY 👑#RolandGarros pic.twitter.com/lZWMplAmYK
— Roland-Garros (@rolandgarros) June 9, 2024
अनेक दिग्गज पूर्वीच पराभूत झाल्याने यंदा फ्रेंच ओपन फायनलमध्ये अल्कारेझ व झ्वेरेव्ह पोहोचले होते. दोघेही प्रथमच लाल मातीवर खेळल्या जाणाऱ्या या ग्रॅंडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळत होते. पहिल्या सेटमध्ये अल्कारेझ याने 6-3 असा विजय मिळवला. मात्र, त्यानंतर झ्वेरेव्ह याने आपला अनुभव दाखवत 6-2 व 7-5 असे सलग दोन सेट जिंकत पुनरागमन केले. झ्वेरेव्ह याच्या पुनरागमनानंतर अल्कारेझ याची बारी होती. त्याने चौथ्या सेटमध्ये 6-1 असा सहज विजय मिळवला. पाचव्या व निर्णायक सेटमध्ये झ्वेरेव्ह काहीसा थकलेला दिसला. याचाच फायदा घेत अल्कारेझ याने 6-2 असा विजय संपादन केला.
अल्कारेझ याने आत्तापर्यंत तीन ग्रँडस्लॅम फायनल खेळल्या असून, या सर्वांमध्ये विजय मिळवण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याने 2022 मध्ये अमेरिकन ओपन, 2023 मध्ये विम्बल्डन व आता फ्रेंच ओपन नावे केले आहे. आगामी पॅरिस ऑलिंपिकमध्येही तो सुवर्णपदकाचा दावेदार असेल.
(Carlos Alcaraz Won French Open 2024 Men’s Singles At Roland Garros)