Carlos Alcaraz Won Men’s French Open 2025: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात स्पेनचा कार्लोस अल्कारेझ व इटलीचा यानिक सिन्नर (Jannik Sinner) समोरासमोर आले होते. अंतिम सामन्यात अल्कारेझ याने सिन्नरला पराभूत करत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन आपल्या नावे केली. पाच तास 28 मिनिटे चाललेला हा अंतिम सामना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा अंतिम सामना ठरला.
Carlos Alcaraz Won French Open 2025
जागतिक क्रमवारी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या दोन युवा खेळाडूंमधील सामन्यात सुरुवातीला सिन्नरने सलग दोन सेट जिंकत आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये अल्कारेझने पुनरागमन करत सेट आपल्या नावावर केला. चौथ्या सेटमध्ये सिन्नरने 5-4 अशी आघाडी घेतली होती. सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या गेम मध्ये त्याच्याकडे 3 मॅच पॉईंट होते. मात्र, इथेच अल्कारेझ याने आपला खेळ उंचावला.
त्याने सलग तीन मॅच पॉइंट वाचवत गेम आपल्या नावे केला. हा सेट टायब्रेकरमध्ये गेल्यावर अल्कारेझने सेट नावे करत सामना निर्णय पाचव्या सेटमध्ये नेला. पहिले दोन गेम अल्कारेझने जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर सिन्नरनेही दोन गेम आपल्या नावे गेले. या सेटमध्ये अल्कारेझकडे 5-3 अशी आघाडी होती. मात्र, अव्वल मानांकित सिन्नरने आपला दर्जा दाखवून सेट 5-5 असा बरोबरीत आणला. अखेर 6-6 अशा बरोबरीनंतर सामना सुपर टायब्रेकरमध्ये गेला. तेव्हा अल्कारेझने सिन्नरला प्रतिकाराची कोणती संधी न देता दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
बातमी अपडेट होत आहे…