Breaking News

ब्रेकिंग! Cheteshwar Pujara चा क्रिकेटला अलविदा, दोन दशकांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची समाप्ती

cheteshwar pujara
Photo Courtesy: X

Cheteshwar Pujara Announced Retirement From All Forms Of Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने खेळाडू म्हणून क्रिकेटच्या आपल्या प्रवासाची समाप्ती केली. 

Cheteshwar Pujara Announced Retirement From All Forms Of Cricket

राहुल द्रविड याच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पुजारा याने आपली छाप पाडली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2010 मध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत. पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत 103 सामने खेळताना 46.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या. यामध्ये 19 शतकांचा समावेश होता. त्याने भातासाठी पाच वनडे सामने खेळले. तसेच प्रथमश्रेणी कारकिर्दीत 21301 धावा जमवल्या.

पुजारा त्याच्या भक्कम बचावात्मक खेळासाठी ओळखला जात. मायदेशात तसेच विदेशात देखील त्याने आपल्या अप्रतिम फलंदाजीने भारतीय संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या 2018 व 2021 अशा दोन्ही कसोटी मालिका विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याने भारतासाठी आपला अखेरचा सामना 2023 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळलेला. भारतीय संघातून बाहेर केल्यानंतर तो समालोचक म्हणून दिसत आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

हे देखील वाचा- कायद्याच्या कचाट्यात सापडलेली Dream 11 नक्की पैसे कमवायची तरी कशी ?