![cm punk](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/07/cm-punk.jpg)
CM Punk: मागील काही दिवसांपासून डब्लूडब्लूई सुपरस्टार (WWE Superstar) सीएम पंक (CM Punk) चांगलाच चर्चेत आहे. त्याच्यामुळे सेथ रॉलिन्स आणि ड्रू मॅकेन्टायर हे वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन (World Heavyweight Champion) होण्यापासून वंचित राहिले होते. आता तोच पंक लवकरच इन रिंग रिटर्न होणार आहे (CM Punk Comeback).
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या डब्लूडब्लूई रॉयल रंबल (WWE Royal Rumble) मध्ये पंकने पुनरागमन केले होते. मात्र, त्याच सामन्यात त्याला दुखापत झालेली. त्यामुळे तो पुन्हा एकदा रिंगपासून दूर गेलेला. मिळत असलेल्या माहितीनुसार, पंक आपले पुनरागमन करण्यासाठी मेहनत करत आहे. त्याला नुकतेच परफॉर्मन्स सेंटरवर पाहण्यात आले.
डब्लूडब्लूईमध्ये मागील काही दिवसांपासून पंक व मॅकेन्टायर यांच्यातील दुश्मनी दाखवली जात आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या समरस्लॅममध्ये या दोघांचा सामना होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, असे होऊ शकले नाही. आता पंक, मॅकेन्टायर व सेथ रॉलिन्स यांच्या दरम्यान ट्रिपल थ्रेट मॅच होण्याची शक्यता आहे.
(CM Punk Looking For WWE Return)
WWE सुपरस्टार John Cena ची निवृत्तीची घोषणा! 23 वर्षाच्या करियरला देणार विराम