Breaking News

Duleep Trophy 2024: गिल-राहुलच्या ‘इंडिया ए’चा पराभव, ‘इंडिया बी’चा विजयी प्रारंभ, पंत-मुशीर ठरले हिरो

duleep trophy 2024
Photo Courtesy: X/BCCI Domestic

Duleep Trophy 2024: दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) च्या पहिल्या फेरीचे सामने रविवारी (8 सप्टेंबर)‌ समाप्त झाले. भारत अ विरूद्ध भारत ब‌ (INDA v INDB) यांच्यातील सामन्यात भारत ब संघाने 76 भावाने विजय मिळवला.‌ कर्णधार शुबमन गिल (Captain Shubman Gill) व केएल राहुल (KL Rahul) या अनुभवी खेळाडूंच्या भारत अ संघाला पराभव पत्करावा लागला.

स्पर्धेतील पहिले तीन दिवस वर्चस्व गाजवलेल्या भारत ब संघाने अखेरच्या दिवशी देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अखेरच्या दिवशी रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत ब संघाने आपल्या दुसऱ्या डावात 184 पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारत अ संघासमोर विजयासाठी 275 धावांचे आव्हान होते. या आमच्या धावसंख्येच्या दबावात भारत अ संघ ढेपाळला.

कर्णधार शुबमन गिल 21 तर मयंक अगरवाल केवळ तीन धावा करून बाद झाला. अष्टपैलू रियान पराग याने केवळ 18 चेंडूंमध्ये 31 धावा केल्या. त्यानंतर ध्रुव जुरेल व तनुष कोटियान खातेही खोलु शकले नाहीत. त्यामुळे संघ संकटात सापडला होता. अनुभवी केएल राहुल याने 121 चेंडूंमध्ये 57 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, शिवम दुबे व कुलदीप यादव प्रत्येक या 14 धावा करत बाद झाले. आकाशदीप याने महत्त्वपूर्ण 43 धावा केल्या. परंतु, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. भारत अ साठी वेगवान गोलंदाज यश दयाल याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

पहिल्या डावात भारत ब संघासाठी 181 धावांची शानदार खेळी करणाऱ्या मुशीर खान (Musheer Khan) याला सामनावीर पुरस्काराने गौरवले गेले. यापूर्वी, अनंतपुर येथे झालेल्या भारत क विरुद्ध भारत ड (INDC v INDD) यांच्यातील सामन्यात भारत क संघाने तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला होता. दोन्ही विजय संघांना प्रत्येकी सहा गुण देण्यात आले आहेत.

(Duleep Trophy 2024 Idia B Beat India A)