Breaking News

ENG vs IND Edgbaston Test Day 2: ‘शुबमन शो’नंतर गोलंदाजांचा कहर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind edgbaston test day 2
Photo Courtesy: X

ENG vs IND Edgbaston Test Day 2 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. भारतीय संघाने पहिल्या डावात उभारलेल्या 587 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 77 धावा बनवल्या होत्या. भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill 200) याचे द्विशतक दुसऱ्या दिवसाचे आकर्षण राहिले.

ENG vs IND Edgbaston Test Day 2 Highlights

– भारताने दुसऱ्या दिवशी 5 बाद 310 वरून सुरू केला डाव

– रवींद्र जडेजा याने पूर्ण केले अर्धशतक

– गिल व जडेजा यांच्या दरम्यान सहाव्या गड्यासाठी 203 धावांची मोठी भागीदारी

– जडेजा 89 धावा काढून बाद

– दुसऱ्या सत्रात गिल व वॉशिंग्टन सुंदर यांनी पुन्हा एकदा विणला डाव

– गिलने पूर्ण केले आपले पहिले कसोटी द्विशतक

– विराट कोहलीला मागे टाकत कर्णधार म्हणून भारताकडून सर्वाधिक 255 धावांचा विक्रम गिलच्या नावावर

– सुंदर 42 धावा काढून बाद, गिलसोबत केली 144 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी

– दुसऱ्या सत्राच्या समाप्तीनंतर भारत 7 बाद 564

– तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच गिल 269 धावांची विक्रमी खेळ करत बाद

– भारत 587 धावांवर सर्वबाद, इंग्लंडसाठी फिरकीपटू शोएब बशीरचे सर्वाधिक तीन बळी

– इंग्लंडची खराब सुरुवात, तिसऱ्याच षटकात लागोपाठच्या चेंडूवर ‌आकाश दीपने बेन‌ डकेट व ओली पोपला केले बाद, दोघांचेही खोलले नाही खाते

– सिराजने 19 धावांवर क्राऊलीला दाखवला तंबूचा रस्ता

– जो रूट (नाबाद 18) व हॅरी ब्रूक (नाबाद 30) यांनी दिवसाखेरपर्यंत लढवला किल्ला

– दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड 3 बाद 77

– भारताकडे अद्याप 510 धावांची आघाडीधावांची आघाडी

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Shubman Gill 200: वाह गिल वाह! एजबॅस्टनमध्ये इंग्लंडला दिला द्विशतकी दणका