Breaking News

ENG vs IND Headingley Test: टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड, वाचा Day 3 च्या हायलाईट्स

ENG VS IND
Photo Courtesy: X

ENG vs IND Headingley Test Day 3 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यानच्या हेडिंग्ले कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या शानदार गोलंदाजीनंतर केएल राहुल (KL Rahul) याच्या नाबाद 47 धावा भारताला या सामन्यात पुढे घेऊन गेले. सामन्याच्या चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेत इंग्लंडला आणखी बॅकफूटवर ढकलण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

ENG vs IND Headingley Test Day 3 Highlights

– दुसऱ्या दिवशीच्या 3 बाद 209 वरून इंग्लंडच्या डावाला सुरुवात

– ओली पोप दुसऱ्या दिवशीच्या धावसंख्येत केवळ पाच धावांची भर घालून 106 धावांत तंबूत

– हॅरी ब्रूकचे वेगवान अर्धशतक व बेन स्टोक्ससह 51 धावांची भागीदारी

– जेमी स्मिथला साथीला ब्रूकने लंचपर्यंत इंग्लंडला 5 बाद 327 पर्यंत पोहचवले

– दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला स्मिथ 40 धावा करून बाद

– हॅरी ब्रूक दुर्दैवीरीत्या 99 धावांवर झाला बाद, प्रसिद्ध कृष्णाचा ठरला शिकार

– ब्रूक बाद झाल्यावर ख्रिस वोक्स व ब्रायडन कार्स यांनी केली 44 चेंडूंवर 55 धावांची भागीदारी

– जसप्रीत बुमराहने तळाच्या फलंदाजांना बाद करत इंग्लंडचा डाव 465 वर संपवला, भारताकडे 6 धावांची नाममात्र आघाडी, दुसऱ्या सत्राची समाप्ती

– जसप्रीत बुमराहने मिळवले पाच बळी, विदेशी भूमीवर 12 व्या वेळी केली ही कामगिरी

– भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल केवळ चार धावा करून बाद

– केएल राहुल व साई सुदर्शन यांची 66 धावांची चिवट भागीदारी, पदार्पणवीर साईने बनवल्या 30 धावा

– दिवसाचा खेळ संपताना भारत 2 बाद 90, राहुल 47 तर कर्णधार शुबमन गिल 6 धावांवर नाबाद, भारताकडे 96 धावांची आघाडी

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट

ENG vs IND Headingley Test: पोपच्या शतकाने इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स