Breaking News

भारतीय फलंदाजांनी घेतली इंग्लंडची शाळा! Manchester Test ड्रॉ

manchester test
Photo Courtesy: X

ENG vs IND Manchester Test Day 5 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला गेला. सामन्याच्या चौथ्या व पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांनी तब्बल पाच सत्र टिच्चून फलंदाजी करत, सामना अनिर्णीत राखला. भारतीय संघासाठी अखेरच्या दिवशी शुबमन गिल (Shubman Gill), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) व वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी शतके ठोकली.

ENG vs IND Manchester Test Drawn

– पाचव्या दिवशी राहुल व गिल यांची सावध सुरुवात

– राहुल केवळ तीन धावांची भर घालून 90 धावांवर तंबूत

– शुबमन गिलच्या बोटाला झाली दुखापत

– दुखापतीनिशी खेळत गिलने पूर्ण केले 9 वे कसोटी शतक (Shubman Gill Century)

– शतकानंतर 103 करत बाद झाला गिल, इंग्लंडविरुद्ध एकाच मालिकेत सातशे धावा करणारा तिसरा कर्णधार बनला गिल

– रवींद्र जडेजाला मिळाले पहिल्याच चेंडूवर जीवदान

– लंचपर्यंत भारत 4 बाद 223

– दुसऱ्या सत्रावर संपूर्णपणे भारताचे वर्चस्व

– जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांची शतकी भागीदारी

– दोघांनीही पूर्ण केली आपापली अर्धशतके

– जडेजाने इंग्लंडमध्ये पूर्ण केल्या 1000 कसोटी धावा

– नाबाद भागीदारीसह भारताने घेतली आघाडी

– अखेरच्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने हात मिळवण्याचा दिला प्रस्ताव, मात्र भारताकडून खेळ सुरू

– जडेजाने पूर्ण केले आपले पाचवे कसोटी शतक (Ravindra Jadeja Century)

– वॉशिंग्टन सुंदरने शतक (Washington Sundar Century) पूर्ण करताच भारताने केली हात मिळवणी

– नोव्हेंबर 2021 नंतर भारताने प्रथमच खेळला अनिर्णित सामना

– अनिर्णित सामन्यासह इंग्लंडची मालिकेत 2-1 ने आघाडी

– इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ठरला सामनावीर

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा:

ENG vs IND Manchester Test Day 1: डाव्यांनी गाजवला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Manchester Test Day 2: दुसरा दिवस यजमानांचा! वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Manchester Test Day 3: इंग्लंडची टीम इंडियावर कुरघोडी, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Manchester Test Day 4: गिल-राहुल लढले! वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स