Breaking News

लमिन यमालची कमाल! अवघ्या 16 व्या वर्षी EURO 2024 खेळत रचला इतिहास

euro 2024
Photo Courtesy: X/Lamine Yamal

EURO 2024 Lamine Yamal|युरो कप 2024 (Euro Cup 2024) मध्ये तिसरा सामना स्पेन आणि क्रोएशिया (SPA vs CRO) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात स्पेनचा युवा फॉरवर्ड लमिन यमाल (Lamine Yamal) याने स्वतःच्या नावे एक मोठा विक्रम नोंद केला. या सामन्यासाठी उतरताच तो युरो कप इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने अवघ्या 16 वर्ष 338 दिवस इतक्या लहान वयात त्याने युरो कप खेळण्याची कामगिरी केली (Youngest Player In Euro Cup History Lamine Yamal).

बार्सिलोना युवा अकादमीचा खेळाडू असलेल्या यमाल याने सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना स्पेनचा सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळवलेला. त्याने युरो कपमध्ये पदार्पण करताना पोलंडच्या कास्पर कोझ्लोस्की याचा विक्रम मोडीत काढला. त्याने युरो 2020 मध्ये 17 वर्ष 246 दिवसांचा असताना युरो पदार्पण केले होते.

यमाल याने आत्तापर्यंत स्पेन संघासाठी सात सामने घेताना 2 गोल आणि 4 असिस्ट दिले आहेत. तो स्पेनसाठी सर्वात कमी वयात गोल करणारा खेळाडू देखील आहे.

(Euro 2024 Spanish Lamine Yamal Becomes Youngest Player Who Playing Euro Cup History)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *