Breaking News

IND v ENG 3rd ODI: अहमदाबाद वनडेत खेळाडूंच्या दंडावर हिरव्या पट्ट्या का? कौतुकास्पद कारण आले समोर

ind v eng
Photo Courtesy: X

IND v ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (IND v ENG) यांच्या दरम्यान अहमदाबाद (Ahmedabad ODI) येथे तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकत यापूर्वी मालिकेत विजय आघाडी घेतली असून, हा सामना जिंकून मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी दंडावर हिरव्या पट्ट्या बांधलेल्या दिसल्या. त्याचे कारण आता समोर आले आहे.

Green Ribbons On Players Arms In IND v ENG 3rd ODI

अहमदाबाद येथे होत असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ आयसीसीने सुरू केलेल्या ‘डोनेट ऑरगन सेव्ह लाईवज’ या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. दोन्ही संघातील खेळाडू या सामन्यातून क्रिकेट चाहत्यांना अवयवदानाबाबत जागरूक करतील. भारतीय खेळाडूंनी यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण या उपक्रमाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. बीसीसीआयने याबाबत आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट केली होती‌. तसेच, आयसीसी चेअरमन जय शहा यांनी देखील आयसीसी हा उपक्रम सुरू करत असल्याचे म्हटलेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात सहज विजय मिळवून मालिका खिशात घातली आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आधी आपली तयारी झाल्याचे ते अधोरेखित करू शकतात. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड व बांगलादेशसह अ गटात आहे. भारताने अखेरच्या वेळी 2013 मध्ये ही स्पर्धा आपल्या नावे केली होती.

Green Ribbons On Players Arms In IND v ENG 3rd ODI

अखेर बुमराहविनाच टीम इंडिया खेळणार Champions Trophy 2025, संघात दोन महत्त्वाचे बदल

Champions Trophy 2025 आधी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का! पाच दिग्गज खेळाडूंची माघार, कॅप्टनही बदलला