Breaking News

T20 World Cup विजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस, मिळाले तब्बल ‘इतके कोटी; दक्षिण आफ्रिकाही मालामाल

Indian Team Prize Money: भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा (T20 World Cup 2024) दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने पहिल्यांदाच टी20 विश्वचषक जिंकला आहे. रोहित शर्मा आणि कंपनीला त्यांच्या यशाचे पारितोषिकही मिळाले. 

विजेते आणि उपविजेत्यांना इतके कोटी मिळाले
आयसीसीने टी20 विश्वचषक 2024 सुरू होण्याच्या वेळी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. यावेळी टी20 विश्वचषकासाठी अंदाजे 93.5 कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकण्यासाठी 20.36 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. उपविजेता ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघही श्रीमंत झाला आहे. आफ्रिकन संघाला 10.64 कोटी रुपये मिळाले आहेत.

यावेळी उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही बक्षिसांची मोठी रक्कम मिळाली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 6.55 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सुपर-8 मध्ये आपला प्रवास पूर्ण करणाऱ्या संघांना 3.18 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुसरीकडे, साखळी फेरी टप्प्यात तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना 2.06 कोटी रुपये मिळाले आहेत. सुपर-8 पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांना 25.9 लाख रुपये मिळाले आहेत. भारतीय संघाने सुपर-8 पर्यंत 6 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 पर्यंत 7 सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत सुपर-8 पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्यासाठी भारताला 1.55 कोटी रुपये आणि दक्षिण आफ्रिकेला 1.81 कोटी रुपये मिळाले आहेत.

इंग्लंड आणि अफगाणिस्तानचे संघही मालामाल झाले
इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. उपांत्य फेरीत इंग्लंडला भारताकडून आणि अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. या दोन्ही संघांना 6.55-6.55 कोटी रुपये मिळाले आहेत. सुपर-8मध्ये पोहोचणाऱ्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या संघांच्या नावांचाही समावेश आहे. या संघांना 3.18 कोटी रुपये मिळाले आहेत.

One comment

  1. The following time I read a weblog, I hope that it doesnt disappoint me as much as this one. I mean, I do know it was my option to learn, but I truly thought youd have something attention-grabbing to say. All I hear is a bunch of whining about something that you may repair for those who werent too busy searching for attention.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *