Breaking News

IND v BAN: टॉप 3 च्या हाराकिरीनंतर रिषभ-जयस्वालने सावरले, पहिले सत्र बांगलादेशच्या नावे

ind v ban
Photo Courtesy: X

IND v BAN Chennai Test Day 1: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याला चेन्नई (Chennai Test) येथे सुरुवात झाली. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय युवा वेगवान गोलंदाज हसन मेहमूद (Hasan Mahmud) याने योग्य ठरवत पहिल्या एक तासात, भारताचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. त्यानंतर मात्र रिषभ पंत व यशस्वी जयस्वाल यांनी अभेद्य भागीदारी करत, भारतीय संघाचा डाव सावरला.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. नव्या हंगामातील पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. केवळ सहा धावा काढून तो महमूद याच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शुबमन गिल याला आपले खातेही खोलता आले नाही. तर अनुभवी विराट कोहली याची खेळी देखील फक्त सहा धावांपुरती मर्यादित राहिली. तिघांना देखील हसन महमूद याने बाद केले. पहिल्या तासाच्या खेळानंतर भारतीय संघाने 36 भावांमध्ये तीन गडी गमावले होते.

भारतीय संघ अडचणीत असताना युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल व रिषभ पंत यांनी डावाची सूत्रे हातात घेतली. खराब चेंडूंवर चौकार वसूल करत त्यांनी धावगती वाढवली. पहिल्या सत्राचा खेळ संपेपर्यंत त्यांनी आणखी बळी जाऊ दिला नाही. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर भारतीय संघ 3 बाद 88 पर्यंत पोहोचला होता. जयस्वाल नाबाद 37 तर रिषभ 33 धावांवर खेळत होता.

(IND v BAN Chennai Test Day 1 Jaiswal Pant Crucial Partnership)

IND v BAN: टीम इंडियाच्या नव्या हंगामाचा शुभारंभ! चेन्नई कसोटीत नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेईंग इलेव्हन