Breaking News

IND v BAN: टीम इंडियाच्या नव्या हंगामाचा शुभारंभ! चेन्नई कसोटीत नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेईंग इलेव्हन

ind v ban
Photo Courtesy; x/bcci

IND v BAN Chennai Test: भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (19 सप्टेंबर) आपल्या नव्या क्रिकेट हंगामाची सुरुवात करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला चेन्नई येथे सुरुवात झाले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

भारत प्लेईंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन- नजमुल हसन शांतो (कर्णधार), शदमान इस्लाम, झाकिर हसन, मुशफिकुर रहीम, लिटन दास, शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, हसन मेहमूद, नाहिद राणा.

(IND v BAN Chennai Test Playing XI)