Breaking News

IND v BAN: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, Duleep Trophy तील कामगिरीचे यंगिस्तानला बक्षिस

ind v ban
Photo Courtesy: X/BCCI

IND v BAN First Test: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील या संघात युवा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याला प्रथमच भारतीय संधी मिळाली. तसेच रिषभ पंत (Rishabh Pant) दोन वर्षाच्या कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन करत आहे.

दोन कसोटी सामन्यांचा या मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. तत्पूर्वी, या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली. संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. सलामीवीर म्हणून रोहितसह यशस्वी जयस्वाल संघाचा भाग असेल. मधल्या फळीत शुबमन गिल व केएल राहुल यांच्यासह सर्फराज खान संघातील आपली जागा राखण्यात यशस्वी ठरला. यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत व ध्रुव जुरेल हे संघाचा भाग असतील.

फिरकी व अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव ही चौकडी असेल. वेगवान गोलंदाजीचा भार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासह आकाश दीप व प्रथमच राष्ट्रीय संघात निवड झालेल्या यश दयाल सांभाळेल.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रिषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप व यश दयाल.

(IND v BAN Team India For First Test Yash Dayal Got Call Up)

बांगलादेशविरुद्ध या खेळाडूंची जागा पक्की? Duleep Trophy 2024 चा पहिला सामना पावणार?