![emerging asia cup](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/10/india-a-asia-cup.jpg)
Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळल्या जात असलेल्या एमर्जिंग एशिया कप 2024 (Emerging Asia Cup 2024) स्पर्धेत इंडिया ए संघाचा दुसरा सामना युएई ए संघाविरुद्ध झाला. भारतीय गोलंदाजांनी युएईचा डाव 107 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान 3 गडी गमावत पूर्ण केले. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान ए संघाचा पराभव केला होता.
भारतीय संघाला या सामन्यात प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. वेगवान गोलंदाज वैभव अरोरा व अंशुल कंबोज यांनी चार षटकातच भारताला दोन यश मिळवून दिले. त्यानंतर पाचवे षटक टाकण्यासाठी आलेल्या रसिख सलाम (Rasikh Salam) याने पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर बळी मिळवत युएईचे आव्हान मोडीत काढले. त्यानंतर भारताच्या कामचलाऊ गोलंदाजांनी उर्वरित पाच बळी मिळवत त्यांचा डाव केवळ 107 धावांवर संपवला. युएईसाठी राहुल चोप्रा याने अर्धशतक ठोकले.
विजयासाठी मिळालेले 108 धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरन याच्या रूपाने पहिला धक्का बसला. मात्र, त्यानंतर अभिषेक शर्मा याने विरोधी गोलंदाजांची पिसे काढली. त्याने 24 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 58 धावा काढल्या. कर्णधार तिलक वर्मा याने 21 धावांचे योगदान दिले. अखेर आयुष बदोनी याने नाबाद 12 धावा करत संघाला दुसरा विजय मिळवून दिला.
(India A Beat UAE A In Emerging Asia Cup 2024)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।