Breaking News

T20 World Cup : ‘सुपर 8 फेरी’त ऑस्ट्रेलियाशी भिडणार भारत, ‘या’ दिवशी होणार सामना

T20 World Cup 2024 :- बुधवारी (12 जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (IND vs USA) झालेला साखळी फेरीतील 25वा सामना भारतीय संघाने 7 विकेट्सने जिंकला. हा सामना जिंकत रोहित शर्माच्या सेनेने सुपर आठ फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अ गटातून सुपर आठ फेरी गाठणारा भारत पहिला संघ आहे. भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका संघ ड गटातून पात्र ठरला आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ ब गटातून आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाला आहे. परिणामी आता सुपर 8 मध्ये भारताची कोणाशी लढत होणार?, हेदेखील निश्चित झाले आहे.

आयसीसीने आधीच स्पष्ट केले आहे की भारतीय संघाने आपल्या गटातील पहिल्या दोनपैकी कोणतेही स्थान मिळवले तरीही त्यांना अ1 मानले जाईल. ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या गटात प्रथम स्थान मिळवले असले तरीही त्यांना ब2 संघ मानले जाईल. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 24 जून रोजी सेंट लुसियाच्या मैदानावर होणार आहे. सुपर आठ फेरीतील भारतीय संघाचा हा तिसरा आणि शेवटचा सामना असेल, त्याआधी त्यांना आणखी 2 सामने खेळावे लागतील ज्यासाठी संघांचा निर्णय होणे बाकी आहे. भारतीय संघ सुपर 8 टप्प्यातील पहिला सामना 20 जून रोजी बार्बाडोस येथे खेळणार आहे, तर त्यानंतर 22 जून रोजी अँटिग्वा येथे पुढील सामना खेळणार आहे.

तत्पूर्वी भारतीय संघाला अ गटातील शेवटचा सामना खेळण्याची औपचारिकता पूर्ण करायची आहे, ज्यात त्यांचा सामना कॅनडाच्या संघाशी होईल. हा सामना 15 जून रोजी फ्लोरिडाच्या मैदानावर खेळला जाईल. यानंतर भारतीय संघ आपले पुढचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळण्यासाठी रवाना होईल.

8 comments

  1. It is in reality a great and helpful piece of info. I¦m glad that you just shared this helpful information with us. Please keep us up to date like this. Thank you for sharing.

  2. Would you be enthusiastic about exchanging hyperlinks?

  3. I am impressed with this site, really I am a big fan .

  4. Hmm is anyone else experiencing problems with the pictures on this blog loading? I’m trying to figure out if its a problem on my end or if it’s the blog. Any feedback would be greatly appreciated.

  5. Just desire to say your article is as astounding. The clearness for your submit is just nice and that i can suppose you are an expert on this subject. Fine together with your permission allow me to seize your feed to keep up to date with drawing close post. Thank you one million and please keep up the enjoyable work.

  6. Este site é realmente fantástico. Sempre que acesso eu encontro novidades Você também vai querer acessar o nosso site e saber mais detalhes! conteúdo único. Venha saber mais agora! 🙂

  7. incrível este conteúdo. Gostei muito. Aproveitem e vejam este conteúdo. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para saber mais. Obrigado a todos e até mais. 🙂

  8. Este site é realmente fabuloso. Sempre que acesso eu encontro coisas diferentes Você também vai querer acessar o nosso site e saber mais detalhes! Conteúdo exclusivo. Venha saber mais agora! 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *