Breaking News

Champions Trophy 2025 फायनलसाठी टीम इंडियासमोर 265 धावांचे आव्हान, फलंदाजांचा लागणार कस

champions trophy 2025
Photo Courtesy: X

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) आमनेसामने आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यास आमंत्रित केलेल्या भारतीय संघाने उत्कृष्ट गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 264 धावांवर संपवला. भारतासाठी मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

India Need 265 For Champions Trophy 2025 Final

सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचल्या भारतीय संघाने या सामन्यासाठी कोणताही बदल केला नव्हता. तिसऱ्या षटकातच शमीने कोनली याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला सावरले. हेडने आक्रमक 39 धावा केल्या. वरूण चक्रवर्तीने त्याला बाद केले. यानंतर स्मिथ व लाबुशेन यांनी पुन्हा एकदा संघाला अडचणीतून बाहेर काढले. लाबुशेन व जोश इंग्लिश हे नियमित अंतराने बाद झाल्याने भारताने सामन्यात पुनरागमन केले. यादरम्यान स्मिथने आपले अर्धशतक झळकावले.

स्मिथच्या साथीला आलेल्या ऍलेक्स केरी याने तुफानी फटकेबाजी करत भारतावर दबाव टाकला. त्याचवेळी स्मिथ 71 धावांवर तंबू परतला. तर, ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा अपयशी ठरला व केवळ सात धावांवर बाद झाला. द्वारशुस व एलिस यांनी काही मोठे फटके खेळले. श्रेयस अय्यर याने थेट फेक करत अर्धशतक झळकावलेल्या केरीला तंबूचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण 50 षटके न खेळता 264 धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी शमीने 3 तर चक्रवर्ती व जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

(India Need 265 For Champions Trophy 2025 Final)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप