FIFA World Cup Qualifiers 2026 मधून भारत बाहेर! वादग्रस्त निर्णयाने कतारचा विजय

FIFA World Cup Qualifiers 2026
Photo Courtesy Screengrab/Fancode

FIFA World Cup Qualifiers 2026| फिफा विश्वचषक पात्रता फेरी 2026 मध्ये मंगळवारी (11 जून) भारत आणि कतार (INDvQAT) असा सामना खेळला गेला. दोहा येथे झालेल्या या सामन्यात भारताला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, या सामन्याला वादाची किनार लाभली. या पराभ‌वासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

दुसऱ्या फेरीतील भारतीय संघाचा हा अखेरचा सामना होता. गुरप्रीत सिंह संधू याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या भारतीय संघाने कतारला सुरुवातीपासून झुंजवले. भारताला छांगते (Chhangte) याने 37 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर यजमान संघाने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश लाभले नाही.

यजमान संघ पिछाडीवर असताना 75 व्या मिनिटाला एक वादग्रस्त गोल पाहायला मिळाला. कतारच्या खेळाडूंनी एंड लाइनच्या बाहेर गेलेला चेंडू पुन्हा आतमध्ये घेत गोल केला. यावर भारतीय खेळाडूंनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतरही निर्णय यजमान संघाच्याच बाजूने देण्यात आला. त्यानंतर 85 व्या मिनिटाला अलरावी याने झळकावलेला गोल निर्णायक ठरला. उर्वरित वेळात भारतीय संघ बरोबरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे संघाला हार पत्करावी लागली.

या पराभवामुळे भारतीय संघ आता तिसऱ्या फेरीत पोहचू शकणार नाही. त्यामुळे भारताच्या 2026 फिफा विश्वचषक खेळण्याच्या अपेक्षा संपुष्टात आल्या.

(India Out Of FIFA World Cup Qualifiers 2026 After Controversial Lost Against Qatar)

धक्कादायक! पाकिस्तानच्या पराभवानंतर युट्युबरची गोळी मारून ह’त्या, वाचा नक्की काय घडले?

One comment

  1. I really like your writing style, superb information, regards for posting : D.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *