Breaking News

India T20 Team: नव्या भारतीय टी20 युगाचा सुर्योदय! ‘मिशन 2026’ चा गौती-सूर्याकडून शुभारंभ

india t20 team
Photo Courtesy: X/ Suryakumar Yadav

India T20 Team: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अगदी युवा भारतीय संघ (India T20 Team) निवडला गेला. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करेल. नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली हा संघ भारतात होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) स्पर्धेची तयारी सुरू करेल.

टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली.‌ तर, प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा देखील संघासोबतचा प्रवास समाप्त झाला. त्यानंतर आता भारतीय टी20 क्रिकेटचे हे नवे युग सुरू होत आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादव कर्णधार (Captain Suryakumar Yadav), तर युवा सलामीवीर शुबमन गिल उपकर्णधार (Vice Captain Shubman Gill) असेल. या संघात दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला जागा मिळाली आहे. यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत व संजू सॅमसन या संघात जागा बनवण्यात यशस्वी ठरले. फिनिशर म्हणून संघाची जबाबदारी रिंकू सिंग व रियान पराग यांच्या खांद्यावर असेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

टी20 विश्वचषक जिंकलेल्या संघातील तीनही अष्टपैलू हार्दिक पंड्या, शिवम दुबे व अक्षर पटेल या संघाचा भाग आहे. या संघातील फिरकीची बाजू वॉशिंग्टन सुंदर व रवी बिश्नोई सांभाळतील. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत संघाचा भाग नसेल. त्यामुळे वेगवान गोलंदाजीचा भार मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग व खलील अहमद हे सांभाळणार आहेत.

पुढील टी20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. भारतीय संघ या विश्वचषकात यजमान आणि गतविजेता अशा दोन्ही उपाधी घेऊन उतरेल.

(India T20 Team New Era Starts Under Suryakumar Yadav And Gautam Gambhir)

हे देखील वाचा-Hardik Pandya चे नशीब पुन्हा रूसले! कॅप्टन्सीच्या नादात उपकर्णधारपदही गेले, या 3 कारणांनी झाले डिमोशन