
भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च लीग असलेल्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) च्या आयोजकांनी स्पर्धेच्या पुढील हंगामाबाबत महत्त्वाची माहिती दिल्याची समोर येत आहे. आयोजकांनी अनेक क्लबना सांगितले आहे की, मास्टर राइट्स करार (एमआरए) स्पष्ट होईपर्यंत पुढील हंगाम सुरू होणार नाही, त्यामुळे आयएसएलच्या भविष्याबद्दल (ISL Future) सस्पेंस वाढत आहे.
Indian Super League FSDL And AIFF Controversy
रिलायन्स आणि स्टार यांच्यातील संयुक्त उपक्रम फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (FSDL) हे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) चे व्यावसायिक भागीदार आहेत. ज्यांच्याशी त्यांनी 2010 मध्ये 15 वर्षांचा एमआरए केला होता. करारानुसार, एफएसडीएल एआयएफएफला वार्षिक शुल्क 50 कोटी रुपये किंवा एकूण महसुलाच्या 20% जे जास्त असेल, ते देते. हा करार या वर्षी डिसेंबरमध्ये संपणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसडीएल भारतीय फुटबॉलशी आपला संबंध सुरू ठेवण्यास उत्सुक आहे. परंतु मागील रोख कराराच्या विपरीत, त्यांनी आता आयएसएलचे नियमन आणि संचालन करणारी एक नवीन होल्डिंग कंपनी स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये सहभागी क्लब 60%, एफएसडीएल 26% आणि एआयएफएफ 14% भागधारक असतील. ज्याला एआयएफएफचा विरोध असल्याचे बोलले जातेय.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Top Five OCI Footballers: हे पाच OCI खेळाडू बदलू शकतात भारतीय फुटबॉलचा वर्तमान