
IPL 2025 Suspended: भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला असून, आयपीएल 2025 (IPL 2025) अनिश्चित काळासाठी स्थगित केली गेली आहे. शुक्रवारी (9 मे) झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय झाला.
IPL 2025 has been suspended
पहलगाम येथे झालेल्या दह’शतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान तणाव शिगेला पोहोचला होता. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दह’शतवादी तळांवर हल्ला केला. त्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सीमाभागावर हल्ले केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानवर प्रतिहल्ले केले. या सर्व पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यानचा सामना अर्ध्यातून रद्द केला गेलेला. त्यानंतर अवघ्या काही तासात आता आयपीएल स्थगित केली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धस्थिती निर्माण झाल्यानंतर विदेशी खेळाडूंनी सुरक्षेची चिंता व्यक्त करत, देश सोडण्याची विनंती केली होती. त्यानंतर बीसीसीआयने तातडीची बैठक घेत स्पर्धा पुढे ढकलली.
India-Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्ध सुरू! IPL 2025 होणार रद्द