
Antim Panghal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 साठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील अखेरची दावेदार आहे कुस्तीपटू अंतिम पंघल (Antim Panghal).
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Antim Panghal)
𝗠𝗲𝗱𝗮𝗹 𝗔𝗹𝗲𝗿𝘁🥉🇮🇳
Antim Panghal clinches the Bronze Medal 🥉 and also confirms a Paris Olympic quota for India 🇮🇳 at the World #Wrestling Championships! 😍👏👏
The Jr champion defeats 2-time European Champion 🇸🇪 Jonna Malmgren 16-6 in the 53kg bronze medal bout. 🤼♀️ pic.twitter.com/3zPm93bdHk
— Khel Now (@KhelNow) September 21, 2023
पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये कुस्ती खेळात सर्वांना विनेश फोगटकडून मेडलची अपेक्षा आहे. तिसऱ्यांदा ऑलिंपिक्समध्ये उतरणारी विनेश मेडलची दावेदार असताना, कुस्तीचे जाणकार 19 वर्षाच्या अंतिम पंघल हिलादेखील भारताची होप मानत आहेत. खरंच अंतिम भारताच्या पदरात ऑलिंपिक मेडल टाकेल का? तिचा आजवरचा प्रवास कसा होता? यावर टाकलेली ही एक नजर.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील भगाना गावातील अंतिमचा जन्म. रामनिवास व कृष्णकुमार यांना एकूण पाच अपत्ये. त्यातील पहिल्या चारही मुली. तर अखेरचा मुलगा अन्विल. सलग चौथी मुलगी झाल्याने माता-पिता सोडून इतर कुटुंबासाठी अंतिम नकोशी होती. मात्र, वडील रामनिवास यांनी इतर मुलींप्रमाणे तिला देखील वाढवण्याचा निर्णय घेतला. अंतिमचा जन्म झाला तेव्हा हरियाणात क्रीडा संस्कृती काही प्रमाणात रुजत होती.
अंतिमची मोठी बहीण सरिता राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू होती. ती अंतिमला नेहमी आपले सामने पाहायला घेऊन जायची. तिथे अंतिमला कुस्तीची आवड निर्माण झाली. अगदी कमी वयातच अंतिम चांगली कुस्ती खेळत आहे हे तिच्या लक्षात आल्यावर, तिने हिसारमध्येच तिला आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुली आपले नाव मोठे करतील असा विश्वास रामनिवास यांना झाल्यानंतर, त्यांनी आपल्या गावची जमीन, ट्रॅक्टर आणि इतर संपत्ती विकून हिसारमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. रामनिवास यांच्या म्हणण्यानुसार, हा एक जु’गार होता. मात्र, त्याचवेळी आपल्या मुलींवर विश्वास देखील त्यांना वाटू लागलेला.
हे देखील वाचा- पॅरिस ऑलिंपिक्स 2024: मेडलचे 15 दावेदार| Amit Panghal टोकियोत मेडलचे स्वप्न पूर्ण करणार? 16 वर्षांनी रिंगमध्ये फडकणार तिरंगा?
सरिता कबड्डीत नाव कमावत असताना अंतिम हिने देखील आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली. अंडर 15 आणि अंडर 17 वयोगटात ती नॅशनल चॅम्पियन बनली. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ती अंडर 23 एशियन चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर जिंकण्यात यशस्वी ठरलेली.
अंतिम हिने 2022 मध्ये बर्मिंगहॅम कॉमनवेल्थसाठी झालेला ट्रायल्समध्ये विनेश फोगटला दिलेली लढत सर्वांना आश्चर्यचकित करून गेली. तिची कॉमनवेल्थला जाण्याची संधी थोडक्यात हुकली. मात्र, त्यानंतर झालेल्या एशियन गेम्समध्ये तिने ब्रॉंझ जिंकत आपली दखल घ्यायला भाग पाडले. तिने अंडर 20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकत इतिहास रचला. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय होती. पुढे 2023 मध्ये तिने आपल्या किताबाचा बचाव करत पॅरिस ऑलिंपिक्सचे तिकिट पक्के केले. तिच्या या कामगिरीची दखल घेत तिला भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
पॅरिसमध्ये ती फ्री स्टाईल कुस्ती 53 किलो वजनी गटात लढायला सज्ज आहे. तिचा फॉर्म आणि आपल्या वयोगटातील दबदबा लक्षात घेता, ती मेडल नक्की जिंकणार असे सर्वांना वाटते. मात्र, त्या मेडलचा रंग सोनेरी असावा अशीच सर्वांची इच्छा आहे.
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics Wrestler Antim Panghal)
अधिकचे वाचा-
Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?
पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘देश की बेटी’ Vinesh Phogat यंदा देणार धोबीपछाड
पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| युवा Lakshya Sen च्या रॅकेटमधून येणार ‘गोल्डन स्मॅश?