Breaking News

India-Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्ध सुरू! IPL 2025 होणार रद्द

india-pakistan war
Photo Courtesy: X

India-Pakistan War: भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan War) युद्धाला सुरुवात झाली आहे. भारतातील काही शहरांवर पाकिस्तानने हल्ले केल्यानंतर, भारतीय वायुदलाने देखील चोख प्रत्युत्तर दिल्याने, अधिकृतरित्या युद्ध सुरू झाल्याचे बोलले जातेय‌. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आयपीएल 2025 (IPL 2025) कोणत्याही क्षणी रद्द केली जाऊ शकते.

IPL 2025 Might Cancelled Due To India-Pakistan War

भारत-पाकिस्तान सीमेवर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान गुरुवारी धर्मशाला येथे खेळला जात असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्ध्यातून रद्द केला गेला. सुरक्षेच्या कारणास्तव मैदानातून सर्व प्रेक्षकांना लवकर बाहेर पडण्यास सांगितले गेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या सर्व पार्श्वभूमीवर आता आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची तातडीची बैठक होत आहे. या बैठकीत आयपीएल थांबवण्याविषयी अथवा रद्द करण्याविषयी निर्णय होऊ शकतात. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी खास रेल्वेने दिल्ली व पंजाबचे खेळाडूंना इतरत्र हलवण्यात येईल.

(IPL 2025 Might Cancelled Due To India-Pakistan War)

हे देखील वाचा- दोन सामन्यासाठी राजस्थानने बोलावलेला Lhuan dre Pretorius आहे कोण ? वय 19 आणि थेट जेसी रायडरशी तुलना