
Jasprit Bumrah Fifer: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडचा डाव 465 धावांवर संपवला. भारतीय संघासाठी अनुभवी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पाच बळी मिळवले. यासोबतच विदेशात कसोटी खेळताना त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
Jasprit Bumrah 12th Fifer On Foreign Soil
हेडिंग्ले कसोटीच्या (Headingley Test) तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 3 बाद 201 धावांवरून खेळ सुरू केल्यानंतर, हॅरी ब्रूकने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंड 400 च्या पुढे मजल मारू शकला. इंग्लंडला 465 धावांवर गुंडाळताना बुमराह याने सर्वाधिक पाच फलंदाजांना बाद केले. यासोबतच त्याने विदेशी भूमीवर आपले 12 वे पंचक पूर्ण केले.
त्याने हे पाच बळी मिळवताना भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची बरोबरी केली. बुमराहने विदेशात केवळ 34 वी कसोटी खेळताना हा कारनामा केला. तर, कपिल देव यांनी यासाठी 66 सामने खेळले होते. ईशांत शर्मा याने विदेशात 63 कसोटी खेळताना 9 वेळा पाच बळी मिळवण्यात यश मिळवलेले.
जसप्रीत बुमराह याने आत्तापर्यंत 46 वी कसोटी खेळताना 210 बळी मिळवले आहेत. यामध्ये त्याने 19.33 अशी सरासरी तर 2.77 अशी इकॉनॉमी राखली आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट
ENG vs IND Headingley Test: पोपच्या शतकाने इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।