Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) सातत्याने चर्चेत असतात. भारतीय क्रिकेट संघाने नुकताच टी20 विश्वचषक जिंकला. त्यावेळी शाह हे सातत्याने भारतीय संघासोबत दिसून आले. बीसीसीआय (BCCI) सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष अशा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत. मात्र, आता त्यांच्याकडे यापेक्षा मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
Jay Shah is certain to be elected unopposed as the new ICC Chairman if he wishes to contest for the post. (Cricbuzz). pic.twitter.com/ViJ5wyOh5Q
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 8, 2024
बीसीसीआय सचिव (BCCI Secretary) म्हणून शानदार कामगिरी केलेल्या शाह यांच्याकडे थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या जागतिक क्रिकेटचे संचालन करणाऱ्या संघटनेचे प्रमुख होण्याची संधी आहे. आयसीसी (ICC) आगामी नोव्हेंबर महिन्यात नव्या चेअरमन पदासाठी निवडणूक घेऊ शकते. यामध्ये शाह यांनी रस दाखवल्यास ते थेट आयसीसी चेअरमन (ICC Chairman) होऊ शकतात.
सध्या आयसीसी चेअरमन असलेले न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले नोव्हेंबर महिन्यात या पदावरील आपली चार वर्षे पूर्ण करतील. नियमाप्रमाणे ते आणखी दोन वर्षे या पदावर राहू शकतात. मात्र, शाह यांनी या पदासाठी इच्छुकता दर्शवल्यास बार्कले हे माघार घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शाह हे सर्वात तरुण आयसीसी चेअरमन बनतील.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
शाह यांनी हे पद स्वीकारल्यास 2028 मध्ये पुन्हा एकदा बीसीसीआयमध्ये परतू शकतात. त्यांच्याकडे थेट बीसीसीआय अध्यक्ष बनण्याची संधी असेल. शाह हे मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट प्रशासनात आहेत. गुजरात क्रिकेट संघटनेत काम केल्यानंतर त्यांनी बीसीसीआय सचिव म्हणून सूत्रे हातात घेतली. त्यांच्या काळात भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या. तसेच अनेक आयसीसी अधिकारी देखील सध्या जय शाह हे जागतिक क्रिकेट मधील सर्व ताकदवान व्यक्ती आहेत, असे बोलतात.
(Jay Shah is certain to be elected unopposed as the new ICC Chairman if he wishes to contest for the post)
PKL 11 च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह, फेडरेशनने घेतला मोठा निर्णय, कबड्डीप्रेमींचा…