Breaking News

आयपीएल 2025 च्या पहिल्या दिवशीच वाद! Jio Hotstar च्या ‘त्या’ निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा

JIO HOTSTAR
Photo Courtesy: X

Jio Hotstar Exclude Irfan Pathan From IPL 2025 Commentry Panel: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू व समालोचक इरफान पठाण याला आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर करण्यात आले आहे. काही खेळाडूंनी त्याच्यावर वैयक्तिक अजेंडा चालवण्याचा आरोप केला होता. त्यामुळे आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या जिओ-हॉटस्टार व बीसीसीआय यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर आता सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

Jio Hotstar Exclude Irfan Pathan From IPL 2025 Commentry Panel

मिळत असलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून इरफानच्या कॉमेंट्रीदरम्यान काही खेळाडूंविरोधात पक्षपातीपणा आणि व्यक्तिगत हेतूने प्रेरित टिप्पणी केल्याच्या तक्रारी होत्या. खेळाडूंच्या प्रतिक्रियांनुसार, त्याच्या या वर्तनामुळे बीसीसीआयने त्याला या हंगामासाठी कॉमेंट्री पॅनलमधून वगळण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी संजय मांजरेकर यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला होता. मात्र, या निर्णयाबाबत अधिकृत माहिती बीसीसीआयकडून स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
इरफान आपल्या कॉमेंट्रीदरम्यान अनेकदा परखडपणे बोलताना दिसतो. मागील आयपीएल वेळी त्याने मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वावर थेट शंका उपस्थित केली होती. तसेच मागील वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली याला पाठीशी घातल्याने अनेक चाहते त्याच्यावर भडकले होते. तसेच, कॉमेंट्री दरम्यान त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला बाहेर करण्याबाबत निर्णय घ्यावा असे म्हटलेले. याच कारणामुळे त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठीच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये देखील समावेश नव्हता.
सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेनुसार, काहींनी याला पक्षपाती पण म्हटले आहे. तर काहींनी धार्मिक बाजू जोडण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणावर इरफान पठाणने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, तो लवकरच आपला युट्युब चॅनेल सुरू करू शकतो असे सांगण्यात येतेय.
Jio Hotstar Exclude Irfan Pathan From IPL 2025 Commentry Panel