Breaking News

WWE सुपरस्टार John Cena ची निवृत्तीची घोषणा! 23 वर्षाच्या करियरला देणार विराम

JOHN CENA
Photo Courtesy: X

John Cena Announced Retirement: प्रसिद्ध डब्लूडब्लूई (WWE) सुपरस्टार जॉन सीना (John Cena) याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 23 वर्षांच्या कारकिर्दीला तो पुढील वर्षी पूर्णविराम देईल. मनी ईन द बॅंक 2024 (Money In The Bank 2024) मध्ये अचानक प्रवेश करत त्याने ही घोषणा केली.

सध्या 47 वर्षांच्या असलेल्या जॉन याने या सामन्यासाठी हजेरी लावताना आपल्या टॉवेलवर ‘द लास्ट टाईम इज नाऊ’ असे लिहीले होते. तर त्याच्या टी-शर्टवर ‘जॉन सीना फेअरवेल टूर’ असे लिहिलेले. त्यानंतर चाहत्यांनी त्याला ‘नो नो’ असे म्हटले. त्यावर प्रतिक्रिया देताना जॉन म्हणाला, “मी आता माझी निवृत्ती घोषित करत आहे. मात्र, मी आत्ताच निवृत्त होणार नाही. पुढील वर्षी 2025 मध्ये मी खेळाला अलविदा करेल.”

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

जॉन सीना याने 2001 मध्ये डब्लूडब्लूएफमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो खेळाच्या सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक बनला. त्याने तब्बल सोळा वेळा चॅम्पियनशिप आपल्या नावे केली. द रॉक ट्रिपल एच, रॅंडी ऑरटन व सीएम पंक यांच्याविरुद्ध त्याच्या लढती विशेष गाजल्या. या व्यतिरिक्त त्याने अनेक हॉलीवुड चित्रपटांमध्ये देखील काम केले. जॉन याचे भारतावर विशेष प्रेम असून तो भारतीय क्रिकेट संघाचा मोठा चाहता आहे.

(John Cena Announced Retirement From WWE)