
Jwala Gutta Donating Breast Milk: भारताची माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आक्रमक खेळ व स्पष्टवक्तेपणामुळे ओळख बनवलेल्या ज्वालाने ममत्वाचे नवे उदाहरण घालून दिले. अनाथ अर्भकांसाठी ज्वाला मागील चार महिन्यापासून ब्रेस्ट मिल्क दान करतेय. तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
Jwala Gutta Donating Breast Milk
आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटनपटू म्हणून नाव कमावल्यानंतर 2021 मध्ये ज्वालाने अभिनेता विष्णू विनोद याच्यासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चार वर्षानंतर या दांपत्याला मुलगी झाली. आपल्या मुलीला स्त’नपान केल्यानंतर रोज ज्वाला आपले ब्रेस्ट मिल्क दान करते. मागील चार महिन्यांपासून दररोज 600 मिलीलिटर दूध ती दान करत आहे. आईच्या दुधापासून वंचित असलेल्या मुलांसाठी ब्रेस्ट मिल्क देणारी ज्वाला भारतातील पहिलीच सेलिब्रिटी बनली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Pawan Sehrawat ची PKL 12 मधून हकालपट्टी! तमिल थलायवाजची कडक कारवाई