
Macau Open 2025: लक्ष्य सेन आणि थरुन मन्नेपल्ली यांनी मकाऊ ओपन, एक BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, भारताची पुरुष दुहेरीचे अव्वल जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Lakshya Sen And Tharun Mannepalli Into Macau Open 2025 Semi Finals
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता लक्ष्यने चीनच्या झू झुआन चेनचा 21-14, 18-21, 21-14 असा एक तास आणि तीन मिनिटांत पराभव करून 2025 मध्ये त्याच्या पहिल्या BWF वर्ल्ड टूर उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली. तत्पूर्वी, 23 वर्षीय थरुनने हू झे अनला हरवून BWF वर्ल्ड टूरवरील त्याच्या पहिल्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने त्याच्या चिनी प्रतिस्पर्ध्याला एक तास आणि 15 मिनिटांत 21-12, 13-21, 21-18 असे पराभूत केले.
भारताची पुरुष दुहेरी जोडी असलेल्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या चुंग होन जियान आणि मुहम्मद हैकल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: अखेर Khalid Jamil पेलणार भारतीय फुटबॉलचे शिवधनुष्य, AIFF कडून मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी