Breaking News

Maharashtra Olympic Association ची निवडणूक बेकायदेशीर? उच्च न्यायालयात याचिका दाखल

maharashtra olympic association
Photo Courtesy: X

Maharashtra Olympic Association Election: मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकांचा घोळ संपण्याचे नाव घेत नाही. मागील आठवड्यात घोषित झालेल्या संघटनेच्या नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेत, ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली गेली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Maharashtra Olympic Association Election

श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत पवार यांनी म्हटले, “महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना ही अशासकीय संस्था असून, संघटनेचा कारभार अत्यंत ‌बेकायदेशीरपणे व ‌राजकीय हस्तक्षेपात ‌सुरू आहे. आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाने नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय द्यावा.”

“न्यायालय व धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संघटनेच्या बेकायदेशीररित्या आयोजित केलेल्या‌ निवडणुकीला पूर्णता स्थगिती देऊन सदर निवडणुका ‌रद्दबातल केल्या आहेत. त्यानंतर ही 2025 ते 2019 या कालावधीसाठी‌ निवडणुका घेऊन ‌23 नोव्हेंबर रोजी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण ‌सभा आयोजित केली आहे. ही सभादेखील बेकायदेशीर असेल. कारण, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ‌म्हणजेच 2017 ते 2025 अखेरच्या कार्यकारी मंडळास ‌बेकायदेशीर ठरवले आहे. धर्मादाय आयुक्तांनी ‌17‌ ऑक्टोबर ‌रोजी रद्दबातल केले असून, तशी ऑर्डरही महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे नवी कार्यकारणी व ‌निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरते.” असे पवार यांनी पुढे म्हटले.

काही दिवसांपूर्वी संघटनेने घोषित केलेल्या कार्यकारिणीत उपमुख्यमंत्री ‌अजित पवार (Ajit Pawar) यांना चौथ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. तर, खासदार व‌ केंद्रीय राज्यमंत्री ‌मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेलेले.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Maharashtra Olympic Association ची नवी कार्यकारिणी जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समावेश, वाचा यादी