
Mohammad Shami Loses Alimony Battle: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कोलकाता उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्याची माजी पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिला मासिक पोटगी देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. हसीन हिने 2018 मध्ये शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झालेला.
Mohammad Shami News
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार मुखर्जी यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, पत्नी हसीनला दरमहा दीड लाख व मुलीला दरमहा अडीच लाख रुपये द्यावे लागणार आहेत. दोन्ही याचिकाकर्त्यांना आर्थिक स्थैर्यता येण्यासाठी ही रक्कम योग्य ठरेल, असे कोर्टाने म्हटले. तसेच, शमी स्वेच्छेने मुलीच्या शिक्षणासाठी योगदान देऊ शकतो, असेही नमूद केले गेले आहे. (Latest Cricket News)
यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाने 2023 मध्ये शमीला पत्नीला प्रतिमहा 50 हजार व मुलीला प्रतिमहा 80 हजार देण्याची सूचना केली होती. मात्र, हसीनने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेली. शमी व हसीन यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर त्यांना 2015 मध्ये एक मुलगी झाली. मात्र, 2018 पासून हसीनने शमी व त्याच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केलेले. तसेच, शमीचे इतर महिलांशी संबंध असल्याचे देखील तिने म्हटलेले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…
Chinnaswamy Stadium Stampede बाबत कोर्टाचा मोठा निर्णय, 11 जणांच्या मृत्यूला यांना धरले जबाबदार