
MPL 2025 Starts Today: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरू होत आहे. पहिल्या दिवशीच भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याने या स्पर्धेचा शुभारंभ होईल. यासोबतच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगची देखील 5 जून रोजी सुरुवात होणार आहे.
𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝐨𝐩𝐞𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐚 𝐬𝐜𝐨𝐫𝐞 𝐭𝐨 𝐬𝐞𝐭𝐭𝐥𝐞!
Ratnagiri Jets 🆚 Eagle Nashik Titanss – The rematch you’ve been waiting for! 🎯🔥
[Maharashtra Premier League, MPL 2025, Cricket]#ThisIsMahaCricket#AdaniMaharashtraPremierLeague #MPL #MPL2025 pic.twitter.com/D2aHZmTqLL— MPLT20Tournament (@mpltournament) June 4, 2025
MPL 2025 Starts With Grand Opening Ceremony
बुधवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याची ड्रोन शो द्वारे सुरुवात होईल. त्यानंतर काही गायकांचे कार्यक्रम पार पडतील. बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिचा लाईव्ह परफॉर्मन्स देखील होणार आहे. तर, 5 युनिटी क्रू हा नामवंत डान्स ग्रुप आपली कला सादर करेल. त्यानंतर लाईट शो व प्रमुख पाहुण्यांच्या संबोधनाने कार्यक्रमाची सांगता होईल. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स असा सायंकाळी सात वाजल्यापासून खेळला जाईल.
एमसीए (MCA) सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करेल. स्पर्धेतील सर्व सामने गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. एमपीएलमध्ये सहा तर डब्ल्यूएमपीएलमध्ये चार संघ खेळताना दिसतील. एमपीएलचा अंतिम सामना 22 जून रोजी तर डब्लूएमपीएलचा अंतिम सामना 14 जून रोजी होणार आहे. हे सर्व सामने जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स 2 येथे प्रक्षेपित होतील. विशेष म्हणजे दोन्ही स्पर्धांसाठी चाहत्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, पार्किंग व पाण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
MPL 2025 Starts With Grand Opening Ceremony
हे देखील वाचा: कोण आहेत RCB सोबत 18 वर्ष लॉयल राहिलेले Mane Kaka? ज्यांच्यासाठी टीमने थांबवला जल्लोष