चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल 2024 च्या साखळी फेरीतून बाहेर व्हावे लागले. अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीने त्यांना पराभूत केले. त्यासोबतच एमएस धोनी निवृत्ती (MS Dhoni Retirement) घेणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्याबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर धोनी आयपीएलमधून ही निवृत्त होणार अशा बातम्या जवळपास तीन वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, प्रत्येक आयपीएल हंगामानंतर त्याने आपण खेळणार असल्याचे स्पष्ट केलेले. आयपीएल 2024 त्याचा अखेरचा हंगाम असणार अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सीएसके बाद फेरीत पोहोचू न शकल्याने तो आता पुन्हा मैदानावर दिसणार नाही असा अंदाज लावला जात आहे. परंतु, खुद्द धोनीकडून याबाबत काहीही बोलले गेले नाही.
CSK CEO said "The way Dhoni batted, he can surely continue but it will be up to him". [Cricbuzz] pic.twitter.com/LaxMVqQeV2
— Johns. (@CricCrazyJohns) May 20, 2024
एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार,
“धोनी चेन्नई संघ व्यवस्थापनाशी आपल्या निवृत्तीबद्दल बोललेला नाही. आणखी काही महिने घेऊन तो आपला निर्णय सार्वजनिक करू शकतो.”
याबरोबरच सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ हे म्हणाले,
“या हंगामात धोनीने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यावरून तो नक्कीच पुढेही खेळू शकतो असे दिसते. परंतु, काय करायचे हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे.”
धोनीने आता वयाची 41 वर्ष पार केलेली आहेत. चेन्नईला तब्बल पाच विजेतेपदे त्याने कर्णधार या नात्याने मिळवून दिली. पुढील वर्षी मेगा ऑक्शन होणार असल्याने सीएसकेला त्याला रिटेन करावे लागेल. त्याला कायम केल्यास एका अन्य खेळाडूची जागा धोक्यात येईल. तसेच तो आणखी किती हंगाम खेळेल याबाबत साशंकता आहे.
(MS Dhoni Retirement Might Be Postponed Till IPL 2025)